• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग! शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या दिल्लीमधील बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय

Admin by Admin
April 13, 2023
in राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग! शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या दिल्लीमधील बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या पार्शवभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज दिल्लीत दाखल झाले. यावेळी या ठिकाणी एक महत्वाची बैठक पार पडली.

या बैठकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, के सी वेणुगोपाल यांच्याबरोबर काही दिग्गज नेते उपस्थित होते. ही बैठक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी पार पडली आहे. या बैठकीमध्ये देशातील सर्व विरोधकांना एकत्र येऊन भाजपविरोधात सामना करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नरेंद्र मोदी (Narendr Modi) यांचा सामना करण्यासाठी तृणूमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी त्याचबरोबर आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यासोबत देखील संवाद साधला जाणार आहे. या बैठकीनंतर शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या बैठकीनंतर तीनही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या बैठकीमध्ये या नेत्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “सर्वांना सोबत घेऊन आम्हाला देशाचा विकास करायचा आहे. देश वाचवण्यासाठी आम्ही विरोधक एकत्र आलो आहोत. आम्ही सर्व मोदींविरोधात एकजूट होऊन लढणार आहोत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Previous Post

सांगलीत महाविद्यालयीन तरूणाचा निघृर्ण खून, अवघ्या तासाभरात तिघे संशयित ताब्यात..!

Next Post

शरद पवारांना मोठा धक्का! भुजबळांचा विश्वासू नेता शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शरद पवारांना मोठा धक्का! भुजबळांचा विश्वासू नेता शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार

शरद पवारांना मोठा धक्का! भुजबळांचा विश्वासू नेता शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group