• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत महाविद्यालयीन तरूणाचा निघृर्ण खून, अवघ्या तासाभरात तिघे संशयित ताब्यात..!

Admin by Admin
April 13, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : सांगली – माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखाना परिसरात एका महाविद्यालयीन तरूणावर कुकरी सदृश्य हत्याराने मानेवर, छातीवर वार करून त्याचा खून करण्यात आला.

गुरुवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली. खुनाची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षिरसागर तातडीने घटनास्थळी पोहोचले. तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

राजवधर्न राम पाटील (वय १८, सध्या. रा. बुधगाव, मूळ रा. मतकुणकी, ता. तासगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

राजवधर्न वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील शासकीय आयटी आयमध्ये शिकत होता. बुधवारी महाविद्यालयात त्याचा काही तरूणांशी एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाला होता. गुरुवारी हा वाद पुन्हा उफाळून आला.

संशयितांनी त्याचा माग काढत गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्याला वसंतदादा कमानीजवळ गाठले. यावेळी संशयितांनी त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजवधर्न कारखान्याच्या दिशेने पळाला.

संशयितांनी त्याचा पाठलाग करून कुकरी सदृश्य हत्याराने त्याच्या मानेवर तसेच छातीवर वरमी घाव घातले. राजवधर्न रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयित तेथून निघून गेले. याची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी
सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी राजवधर्न याच्या मित्रांकडे चौकशी केल्यानंतर बुधवारी त्याचा काही तरूणांशी वाद झाल्याची माहिती मिळाली. शिवाय त्याच्यावर हल्ला करणारे तरूण अनोळखी होते असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. त्यांच्याकडे पोलिस कसून चौकशी करत आहेत.

Previous Post

सांगलीत मंत्र्यांना मॅनेज करून सावळीत जागा खरेदी. ! जमीन एकाची अन् धनादेश एकाच्या नावाने.?

Next Post

ब्रेकिंग! शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या दिल्लीमधील बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग! शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या दिल्लीमधील बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय

ब्रेकिंग! शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या दिल्लीमधील बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group