कडेगाव :- कडेगाव येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात भूमापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपअधीक्षक सौ लता घरत यांच्या हस्ते इटीएस मोजणी यंत्राचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यालय सहाय्यक श्रीमती शुभांगी हजारे, निमतानदार सतीश काटे उपस्थित होते.
यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सौ घरत म्हणाल्या की, आपल्या कार्यालयाशी निगडित शेतकरी हा आपला केंद्रबिंदु आहे. शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी आपली नियुक्ती शासनाने केली आहे हे आपल्या लक्षात असायला हवे. आपले कर्तव्य पार पाडत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. कार्यालयातील कामकाजाबाबत नागरिकांना त्रास होईल असे कामकाज शक्यतो टाळावे सर्वांना सहकार्य करण्याची आपली भूमिका असावी.

यावेळी परिरक्षण भूमापक सचिन जाधव, विनोद थोरात, गोकुळ कापसे, विपुल वाघमोडे, नसरीन मुल्ला, अशोक पाटील, सतीश पवार, अशोक कांबळे आणि सुनील चन्ने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

