• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बाबरी मशिद पाडणारा शिवसैनिक मिरजेचा, चंद्रकांत पाटील हा घ्या पुरावा – संजय विभूते आक्रमक.

भाजपवाले पिठलं-भात खात बसले होते

Admin by Admin
April 13, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
बाबरी मशिद पाडणारा शिवसैनिक मिरजेचा, चंद्रकांत पाटील हा घ्या पुरावा – संजय विभूते आक्रमक.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली: खबऱ्या प्रतिनिधी/ बाबरी पतनात सहभागी असलेल्या एका शिवसैनिकाला पत्रकार परिषदेत हजर करुन शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला.

हा पुरावा पाहून चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी दिला.

विभुते यांच्यासह शिवसेनेचे नेते बजरंग पाटील, उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर तसेच बाबरी मशिद पाडण्यात प्रत्यक्ष सहभागी असणारे शिवसैनिक सुरेश शेळके यांनी पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लबोल केला. विभुते म्हणाले की, बाबरी पाडण्यात शिवसैनिक होते हे यापूर्वीच भाजप नेत्यांनी जाहीरपणे मान्य केले असतानाही चंद्रकांत पाटील यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचे वक्तव्य म्हणजे मानसिक संतुलन बिघडल्याचेच लक्षण आहे.

त्यामुळे आम्ही त्यांना मिरजेच्या रुग्णालयात दाखल करु. त्यांची मानसिकता ओळखूनच भाजप नेत्यांनी राज्यातील दोन नंबरच्या मंत्रीपदावरून त्यांना दूर केले आहे. बाळासाहेब ठाकरेंचे बोट धरुन आलेली भाजप राज्यात व देशावर राज्य करत आहे. मात्र बाळासाहेबांचा त्यांना विसर पडला आहे. आमच्यावर मोदींचे नाव घेऊन मते मागितले, असा आरोप करणाऱ्यांनी हिंमत असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न घेता निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.

भाजपवाले पिठलं-भात खात बसले होते

शेळके यांनी बाबरी पतनाच्या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही बाबरी मशिद पाडत होतो त्यावेळी भाजपचे नेते दोन किलोमिटर दूरवर पिठलं-भात खात बसले होते.

Previous Post

कडेगाव उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात भूमापन दिन साजरा

Next Post

मोठी बातमी! शरद पवारांबाबत काँग्रेस नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी! शरद पवारांबाबत काँग्रेस नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट

मोठी बातमी! शरद पवारांबाबत काँग्रेस नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group