मुंबई, दि. ०९ [प्रतिनिधी] :- प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा म्हणजे प्रभू श्री रामाच्या दर्शनाचा दौरा नसून मुख्यमंत्री पदाचा राम-राम घेणारा दौरा होय. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने महाराष्ट्राच्या सत्तेच्या महानाट्यातील शेवटच्या अंकावरून काही दिवसांतच पडदा उठणार असून या अंकात एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊन मुख्यमंत्री पदाची माळ राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात पडणार असल्याचे वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून मिळाले आहे.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे सेनेच्या १६ आमदारांच्या पात्र-अपात्रतेच्या विषयात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पुढील दहा-पंधरा दिवसांत येणार आहे. हा निकाल शिंदे सेनेच्या विरोधात येणार असल्याचे संकेत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे-सेनेच्या विरोधात आल्यास एकनाथ शिंदे यांची आमदारकी जावून त्यांचे मुख्यमंत्री पद ही जाणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रा सारख्या महत्वाच्या राज्यातील आपली सत्ता ही जावू नये आणि सत्ता पिपासू म्हणून, सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे सारख्या सरळ स्वभावाच्या माणसाचा बळी घेतला म्हणून आपल्यावर चिखलफेक होऊनये म्हणून देवेंद्र भाजप आणि अमित शहा यांनी या महानाट्याच्या रचित ‘स्क्रिप्ट’ नुसार राजकीय खेळी सुरू केल्या असल्याचे कळते.
याच खेळीचा भाग म्हणून नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेली शरद पवारांची भेट. शरद पवारांनी अदाणी प्रकरणात अडचणीत येत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीने हिताची अशी घेतलेली भूमिका. चंद्रकांत पाटील यांनी “रात गयी, बात गयी… मिलो तो बात बनजाये…” म्हणत थेट उद्धव ठाकरेंना घातलेली साद. देवेंद्र फडणविसांनी केलेली प्रश्न महाराष्ट्राच्या सत्तेचा…शक्तिप्रदर्शन अयोध्येत… खलबतं दिल्लीत…! अशी राजकीय कसरत, या साऱ्या बाबी विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती सत्य असल्याचे प्रमाण देत आहेत.
या राजकीय खेळीबाबत मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा भगवान श्री रामाच्या दर्शनाचा दौरा नसून सत्तेच्या राम-रामाचा दौरा होय. शिंदे यांचा राजीनामा जेवढा निश्चित झाला आहे, तेवढाच भाजपचा मुख्यमंत्री पदाचा दावेदार अनिश्चित आहे. कारण या पदाचा दावेदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव देवेंद्र भाजप कडून पुढे केले जात असले तरी शिंदे सरकार स्थापनेवेळी जशी या नावाला हुलकावणी मिळाली, तशीच हुलकावणी यावेळेसही मिळणार असल्याचे कळते. यास महत्वाचे कारण म्हणजे अमित शहा यांची भूमिका.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अमित शहा यांच्या मते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे एकनाथ शिंदे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्यास त्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुखमंत्री पद स्वीकारणे हे त्यांच्याच राजकीय भविष्याच्या दृष्टीने हिताचे ठरणार नाही.
फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद घेतल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिंदे यांचे पद गेले तरी फडणवीस यांच्या अघोरी राजकीय महत्वाकांक्षेमुळेच राज्यातील उद्धव ठाकरे सरकार आणि शिंदे सरकार पडले, फडणवीस यांच्या अघोरी राजकीय
महत्वाकांक्षेमुळेच राज्यात अस्थिरता निर्माण झाली; असा अपप्रचार सुरू होईल आणि त्याचा फटका फडणवीस यांच्या सोबतच भाजपला बसेल. परिणामी पुढील विधानसभा निवडणुकीत याची फारमोठी किंमत भाजपला मोजावी लागेल. त्यामुळे अशा वातावरणात राज्याचे मुख्यमंत्री पद फडणवीस
यांच्याकडे देण्यास अमित शहा उत्सुक नसल्याचे कळते.
मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी राधाकृष्ण विखे पाटील यांना पसंती देतांना चंद्रकांत दादा पाटील, सुधीर मूनगंटीवार, गिरीश महाजन यांच्या नावांवर ही चर्चा झाल्याचे कळते. परंतु ईतर पक्षातून भाजपत आलेल्या तमाम राजकीय नेत्यांना संदेश देण्यासाठी, अप्रत्यक्षपणे शरद पवारांना धक्का
देण्यासाठी फडणवीस यांच्या विश्वासातील मुरब्बी राजकारणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते.
एकनाथ शिंदे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्या दौऱ्यातील त्यांचे आजचे शक्तिप्रदर्शन, दिल्ली दौऱ्यावर निघालेल्या फडणवीस यांनी अचानकपणे अयोध्या गाठून घेतलेली त्यांची भेट ह्या बाबीही याचेच प्रमाण देत आहेत की, शिंदे यांचा हा प्रभू श्री रामाच्या दर्शनाचा दौरा नसून सत्तेच्या राम- रामाचा दौरा होय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदे सरकार स्थापनेच्यावेळी लिहिल्या गेलेल्या ‘स्क्रिप्ट’ मधील मुद्यांवर चर्चा करण्यासाठीच देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे निघाले आहेत. या चर्चेत अंतिम निर्णय होण्यापूर्वी शिंदेंशी अंतिम चर्चा करण्यासाठीच त्यांनी आज अचानकपणे अयोध्या गाठली होती.

