• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत महिलेवर खुनी हल्ला ; दोघांना अटक.

Admin by Admin
April 9, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
खून | जतमध्ये किरकोळ वादातून हाणामारी : एकाचा मृत्यू ; संशयित आरोपी फरार..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी/ मिरज येथील पूर्व म्हाडा कॉलनी, देवताळे मळा या ठिकाणी पुर्वी झालेल्या वादातून एका महिलेवर दबा धरून बसलेल्या दोघांनी कुऱ्हाडीने घाव घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. राधिका कांबळे (वय २५) असे जखमी महिलेचे नाव आहे.

जुनेद रफीक मुश्रीफ , साकिर जलील शेख हे दोघे रविवारी राधिका कांबळे यांच्या घरा जवळ दबा धरून बसले होते. राधिका या घराबाहेर आल्यानंतर जुनेद मुश्रीफ याने कुऱ्हाडीने डोक्यात वार करत हल्ला केला. हल्ला करून जुनेद मुश्रीफ हा पळून गेला होता. तर म्हाडा कॉलनी येथील नागरिकांनी साकिर शेख याला पकडुन चोप देत पोलीसांच्या ताब्यात दिले होते. घटना स्थळावर पोलीस तात्काळ पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. डोक्यात कुऱ्हाडीचा घाव बसल्याने गंभिर जखमी झालेल्या राधिका कांबळे यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.

हा हल्ला करताना हल्लेखोर कॅमेरात कैद झाले आहेत. राधिका कांबळे ह्या महिलेने जुनेद मुश्रीफ यांच्यावर पूर्वी पोलिसात तक्रार दिली होती. याबाबत जुनेद मुश्रीफ वर गुन्हा ही दाखल झाला होता. या कारणावरून तिच्यावर हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिरज शहर पोलिसांनी साकिर शेख व जुनेद मुश्रीफ या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

Previous Post

एकनाथ शिंदेंचा सत्तेला रामराम, राधाकृष्ण विखे पाटलांच्या गळ्यात पडणार मुख्यमंत्री पदाची माळ…? प्रश्न महाराष्ट्राच्या सत्तेचा… शक्तिप्रदर्शन अयोध्येत… खलबतं दिल्लीत…!

Next Post

बैलगाडी शर्यतीत ‘रुस्तम ए हिंदकेसरी’ चा मान बकासुर-महिब्या जोडीला ; सदाभाऊ कदम यांना महिंद्रा “थार”..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बैलगाडी शर्यतीत ‘रुस्तम ए हिंदकेसरी’ चा मान बकासुर-महिब्या जोडीला ; सदाभाऊ कदम यांना महिंद्रा “थार”..!

बैलगाडी शर्यतीत ‘रुस्तम ए हिंदकेसरी’ चा मान बकासुर-महिब्या जोडीला ; सदाभाऊ कदम यांना महिंद्रा "थार"..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group