• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

डी मार्ट मध्ये हिंदू ग्राहकाला टिळा पुसण्यास पाडले भाग.? व्हिडिओ व्हायरल..पहा…!

Admin by Admin
April 8, 2023
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Dmart Viral Video: रायगडमधील कर्जतमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कर्जतमधील डिमार्टमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्याने एका ग्राहकाला रामनवमीच्या दिवशी त्याच्या कपाळावरील टीळा पुसण्यास भाग पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

या व्हिडिओत बजरंग दलाचे कार्यकर्ते डिमार्टमधील कर्मचाऱ्यांना जाब विचारताना दिसत असून पोलिसांकडून या घटनेबाबत अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.

ट्विटरवर सुमित अग्रवाल या युजरने व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुमितने ट्विटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टॅग केलं आहे.

सुमित यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, राम नवमीला एक व्यक्ती डीमार्टमध्ये टीळा लावून गेला होता. त्याला डीमार्टमधील कर्मचाऱ्यांनी (Employees) टीळा पुसायला भाग पाडले.

असा प्रकार मुस्लिमांच्या टोपीबाबत होईल का. हा गंभीर प्रकार असून महाराष्ट्र सरकारने याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी.

शर्मनाक घटना-

महाराष्ट्र के रायगढ़ ज़िले के करजत से ये वीडियो अभी प्राप्त हुआ है।करज़त के D-Mart स्टोर ने राम नवमी के दिन हिंदू तिलक धारी ग्राहक को माल देने से मना कर दिया गया।जब उसने पूछा की टोपी पहने मुसलमान भाई को मना क्यूँ नहीं करते तो उसके पास कोई जवाब नहीं था।

वीडियो… pic.twitter.com/lU3sPQ6riE

— Sumit Agarwal 🇮🇳 (@sumitagarwal_IN) April 6, 2023

व्हिडिओत नेमके काय?

राम नवमीला टीळा लावून गेलेल्या हिंदू व्यक्तीला टीळा पुसायला भाग पाडणे गंभीर आहे, असं व्हिडिओतील बजरंग दलाचे कार्यकर्ते म्हणताना दिसतात. यावर, ग्राहकाला टीळा का पुसायला लावले, याचे उत्तर दुकानातील कर्मचाऱ्याला देता आले नाही. आम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही आणि सर्व धर्मांना समानतेची वागणूक देतो, असे सांगत कर्मचारी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात. अशी पुनरावृत्ती झाल्यास पोलिसांत तक्रार करु, असा इशाराही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद झालीये का, डीमार्टने याबाबत काही स्पष्टीकरण दिलंय का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Previous Post

तळ ठोकून बसलेल्या “त्या” कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी..? बदली गॅझेटमधून अभ्यासू व कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांना मिळणार संधी..!

Next Post

लॉजमध्ये कामगाराने घेतले पेटवून ; सांगलीतील घटना.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
लॉजमध्ये कामगाराने घेतले पेटवून ; सांगलीतील घटना.

लॉजमध्ये कामगाराने घेतले पेटवून ; सांगलीतील घटना.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group