• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तळ ठोकून बसलेल्या “त्या” कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी..? बदली गॅझेटमधून अभ्यासू व कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांना मिळणार संधी..!

एल.सी.बी मध्येही होणार मोठी उलथापालथ..?

Admin by Admin
April 8, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
तळ ठोकून बसलेल्या “त्या” कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी..? बदली गॅझेटमधून अभ्यासू व कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांना मिळणार संधी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / पोलीस दलात आपलं कौशल्य वापरून गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी अभ्यासू व तरबेज कर्मचाऱ्यांना गुन्हे अन्वेषण किंवा स्थानिक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेमध्ये संधी दिली जाते. एप्रिल महिना सुरू होताच सर्वच शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागतात. यावर्षी पहिल्यांदाच सांगली पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचे गॅझेट या महिना अखेरपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस ठाण्यात गोपनीय, दप्तरी, कारखून , हजेरी मेजर, व गुन्हे प्रकटीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची चलाखी महत्वाची असते. हीच चपळाई ओळखून पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

गेल्या तीन वर्षांपासून कोरोना, राज्याच्या राजकारणातील  उलथापालथ यामुळे शासकीय स्तरावरील बदल्यांमध्ये विस्कळीतपणा आला होता.

यावर्षी मात्र पूर्वीप्रमाणे एप्रिल, मे तसेच जून
महिन्यात नियमित बदल्या होण्याचे संकेत
मिळत आहेत. त्यामुळे कार्यकाल पूर्ण झालेल्या
तसेच विनंतीवरून बदल्यांसाठी इच्छुक
असलेल्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सांगली जिल्ह्यात यावर्षी या बदल्या वेळेत होण्याचे संकेत आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी त्यासाठी पावले उचलली आहेत.

यावर्षी पोलिस कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे गॅझेट वेळेत होणार आहे. विनंतीवरून बदल्यांसाठी दि. 10 एप्रिलपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानंतर महिना अखेरपर्यंत प्रशासकीय तसेच विनंती बदल्यांचा विचार करून त्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होण्याची दाट शक्यता आहे.

मात्र, वर्षानुवर्षे तळ ठोकून बसलेल्या काही कर्मचाऱ्याच्या बदल्या झाल्या तरी सुध्दा पोलीस मुख्यालयाच्या इमारतीपासून १०० ते २०० मीटर अंतरावरील विविध शाखेमध्ये प्रतिनियुक्तीवर चिटकलेल्या काही कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना आता जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात नेमणूक करणे गरजेचे आहे. अन्यथा कुशल कामगिरी असणाऱ्या आणि विविध कामांमध्ये पारंगत असलेल्या कर्मचाऱ्यांना संधी मिळणार नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होणार आहे.

Previous Post

ब्रेकिंग! नॉट रिचेबल अजित पवार पोहचले थेट पुण्यात; १७ तास नेमके कुठं होते?

Next Post

डी मार्ट मध्ये हिंदू ग्राहकाला टिळा पुसण्यास पाडले भाग.? व्हिडिओ व्हायरल..पहा…!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला

डी मार्ट मध्ये हिंदू ग्राहकाला टिळा पुसण्यास पाडले भाग.? व्हिडिओ व्हायरल..पहा...!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group