• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

व्यंकोचीवाडीत अनोखी हनुमान जयंती ; सलग नऊ दिवस संपूर्ण गावाला अन्नदानाची ऐतिहासिक परंपरा.

प्रत्येक घरात नऊ दिवस चूल बंद.

Admin by Admin
April 6, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : हनुमानाच्या भक्तांचे गाव अशी ओळख असलेल्या मिरज तालुक्यातील व्यंकोचीवाडीने आगळीवेगळी ऐतिहासिक परंपरा जपली आहे. रामनवमी ते हनुमान जयंती या नऊ दिवसात गावातील एकाही घरात चूल पेटविली जात नाही.
नऊ दिवस गावात अन्नदान करण्यात येते.

केवळ दीड हजार लोकसंख्येच्या गावात हनुमान जयंतीनिमित्त गेल्या पंचवीस वर्षांपासून हनुमान सप्ताह सोहळा सुरू आहे. संपूर्ण नऊ दिवस गावात अन्नदान करण्यात येते. अन्नदानासाठी ग्रामस्थांत चढाओढ होते. चिठ्ठीद्वारे नाव निश्चित करून पुढील वर्षाच्या अन्नदानासाठी योगदान देणाऱ्यांची यादी तयार केली जाते.

या नऊ दिवसात गावात कीर्तन सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, जागर अन्नदान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गेल्या पंचवीस वर्षांपासून ही परंपरा गावाने जपली आहे.

यावर्षीही गावात हनुमान जयंती सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नोकरी, उद्योगासाठी देश-विदेशात गेलेले गावातील ग्रामस्थ या सप्ताहानिमित्त गावाकडे येऊन सोहळ्यास उपस्थित राहतात. गावातील सर्वच कुटुंबांची हनुमानावर मोठी श्रद्धा असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील मोठा हनुमान जयंती सप्ताह व्यंकोचीवाडी गावात होत असल्याने हनुमान भक्तांचे गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली आहे.

Previous Post

मैत्री तोडल्याने मारहाण ; सहा जणांवर गुन्हा दाखल

Next Post

मिरजेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या हद्दपार कार्यकर्त्याला अटक ; शुभेच्छा बॅनरवर झळकले होते फोटो.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या हद्दपार कार्यकर्त्याला अटक ; शुभेच्छा बॅनरवर झळकले होते फोटो.

मिरजेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या हद्दपार कार्यकर्त्याला अटक ; शुभेच्छा बॅनरवर झळकले होते फोटो.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group