• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मैत्री तोडल्याने मारहाण ; सहा जणांवर गुन्हा दाखल

Admin by Admin
April 6, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली : वाळूचोरीची बोगस चौकशी ; “त्या” तहसीलदारासह पंचनामा करणाऱ्या पथकाचीच होणार चौकशी.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : मैत्री तोडल्याच्या कारणातून सहा जणांनी युवकास बेदम मारहाण केली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात जखमी ऋषिकेश संतोष वनखडे (वय २५, रा.कुपवाड, सांगली) याने फिर्याद दिली आहे. ही घटना काल, मंगळवारी, (दि. ४) पत्रकारनगर येथील वाहन बाजारात घडली.

पोलिसांनी संशयित प्रवीण रामा शितोळे, गौरव कांबळे (रा. दोन्ही चाणक्य चौक, कुपवाड), आशिष उत्तम कांबळे (रा. मंगलमूर्ती कॉलनी, कुपवाड), सुफियान शेख (रा. कुपवाड), रुद्रप्रताप कारंडे (रा. बजरंगनगर, सांगली) आणि गणेश नावाच्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती अशी की, फिर्यादी ऋषिकेश वनखडे हा त्याचा मित्र विश्वजीत काकडे याच्यासमवेत जुन्या वाहनाचा व्यवहार करण्यासाठी पत्रकारनगर येथील वाहन बाजारात गेला होता. दरम्यान, तेथे संशयीत सहाजण आले आणि त्यांनी ऋषिकेशला, आमच्याशी मैत्री का तोडलीस, याचा जाब विचारला.

यावेळी झालेल्या वादावादीतून संशयितांनी ऋषिकेशला सिमेंटच्या विटेने मारहाण करून जखमी केले. विश्वजीत हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Previous Post

जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला

Next Post

व्यंकोचीवाडीत अनोखी हनुमान जयंती ; सलग नऊ दिवस संपूर्ण गावाला अन्नदानाची ऐतिहासिक परंपरा.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला

व्यंकोचीवाडीत अनोखी हनुमान जयंती ; सलग नऊ दिवस संपूर्ण गावाला अन्नदानाची ऐतिहासिक परंपरा.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group