• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या हद्दपार कार्यकर्त्याला अटक ; शुभेच्छा बॅनरवर झळकले होते फोटो.

Admin by Admin
April 6, 2023
in क्राईम
1 min read
0
मिरजेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या हद्दपार कार्यकर्त्याला अटक ; शुभेच्छा बॅनरवर झळकले होते फोटो.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : मिरजेत शिवसेना शिंदे गटाचा हद्दपार झालेला कार्यकर्ता अमोल दुर्गाप्पा रणधीर (वय ३४, रा.इंदिरानगर, मिरज) यास हद्दपार आदेशाचा भंग करून शहरात फिरताना शहर पोलिसांनी अटक केली. रणधीर याच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरजेतील शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता असलेल्या अमोल रणधीर याच्यावर इंदिरानगर परिसरात अवैध दारू विक्री, मारामारी आदी गुन्हे दाखल आहेत. शहर पोलिसांच्या प्रस्तावावर प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी अमोल रणधीर याच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश पोलिसांना दिला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या शुभेच्छा फलकावर हद्दपार अमोल रणधीर याचे छायाचित्र झळकले होते.

पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे फलकावरील रणधीर याचे छायाचित्र हटविण्यात आले. हद्दपार झाला तरी अमोल शहरात बिनधास्त वावरत हाेता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी दर्गा चाैक परिसरात फिरत असताना अमोल रणधीर यास अटक केली. रणधीर याच्याविरुद्ध हद्दपार आदेशाचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

व्यंकोचीवाडीत अनोखी हनुमान जयंती ; सलग नऊ दिवस संपूर्ण गावाला अन्नदानाची ऐतिहासिक परंपरा.

Next Post

सांगलीत तक्रारदार, साक्षीदार फितूर असतानाही बलात्कार प्रकरणी एकास २५ वर्षे सक्तमजुरी.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत तक्रारदार, साक्षीदार फितूर असतानाही बलात्कार प्रकरणी एकास २५ वर्षे सक्तमजुरी.

सांगलीत तक्रारदार, साक्षीदार फितूर असतानाही बलात्कार प्रकरणी एकास २५ वर्षे सक्तमजुरी.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group