• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

येरवडा कारागृहातील स्वच्छतागृहात सापडला मोबाईल संच..!

Admin by Admin
April 5, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
येरवडा कारागृहातील स्वच्छतागृहात सापडला मोबाईल संच..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे : येरवडा कारागृहातील एका बराकीतील स्वच्छतागृहात मोबाईल संच ठेवल्याचे आढळून आले आहे.

या प्रकरणी कारागृह प्रशासनाकडून येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या पूर्वी कारागृहात गांजा सापडला होता. कारागृहात गांजा पोहोचविल्याप्रकरणी एका कारागृह रक्षकावर कारवाई करून त्याला अटकही करण्यात आली होती.

कारागृह प्रशासनाच्या वतीने सागर बाजीराव पाटील (वय 38,रा. कारागृह वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील बराकी आणि परिसराची नियमित तपासणी केली जाते. कारागृहातील अधिकारी भिरू खळबुटे, अतुल तोवर कारागृहातील सर्कल क्रमांक एक आणि बराक क्रमांक तीनमधील स्वच्छतागृहाची तपासणी करत होते. त्या वेळी स्वच्छतागृहातील पत्रा वाकल्याचे आढळून आले. पत्रा उचकटून पाहिले असता तेथे मोबाईल संच ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले. मोबाईलमध्ये सीमकार्ड नसून बॅटरीचे चार्जिंग करण्यात आले नव्हते. या घटनेची माहिती त्वरित कारागृहातील वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली. कारागृहाच्या पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कारवाईसाठी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोबाईल संचाचा वापर कोणी केला, तसेच कारागृहात मोबाईल पोहोचला कसा, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.

संगमवाडीतील नदीपात्रात सापडले रिव्हॉल्वर –

संगमवाडीतील नदीपात्रात रिव्हॉल्वर सापडल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणाचा येरवडा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. संगमवाडीतील नदीपात्रात रिव्हॉल्वर आणि शिवलिंग मंगळवारी दुपारी सापडले. याबाबतची माहिती येरवडा पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रिव्हॉल्वर ताब्यात घेतले असून या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. रिव्हॉल्वर जुने असून देशी बनावटीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन महिन्यांपूर्वी वारजे भागातील नाल्यात पोलिसांना काडतुसांनी भरलेली पिशवी आणि पिस्तूल सापडले होते. नाल्यात काडतुसांनी भरलेली पिशवी आणि पिस्तूल टाकून दिल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Previous Post

म्हैसाळ योजनेच्या कालव्यात दोन तरुण बुडाले ; बेडग येथील घटना

Next Post

लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांची बदली

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा परिषदेच्या शाळा उद्यापासून सकाळ सत्रात ; उन्हाचा पारा वाढला..!

लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांची बदली

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group