• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलीस दलामध्ये जातीयतेचा रंग ? “धना”साठी पाटलांची मनमानी..? “जात” नाहीच जात..!

साहेब, जातीपेक्षा निष्ठा आणि कर्तव्य पहा..!

Admin by Admin
March 13, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय, विशेष, शैक्षणिक, शोध पत्रकारिता, सामाजिक
1 min read
0
पोलीस दलामध्ये जातीयतेचा रंग ? “धना”साठी पाटलांची मनमानी..? “जात” नाहीच जात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / जिल्हा पोलीस दलाचे नाव अलीकडच्या काही वर्षात पुन्हा अभिमानाने “मान” उंचावत असतानाच, काही ढोंगबाज अधिकाऱ्यांमुळे जनमाणसांत मान खाली घालायला लागेल अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू लागली आहे.

जिल्हा पोलीस दलातील किडक्या वृत्तीच्या “धना”साठी आपली “पाटीलकी” पणाला लावणाऱ्या अधिकाऱ्याला संपूर्ण जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख “मी”च आहे, अशी दिवसा स्वप्ने पडू लागल्याने, पोलीस ठाण्याचे प्रमुख सुध्दा त्याला “अभि”के “अभि” म्हणत जातीयतेची साथ देत आहेत.

पोलीस म्हणजे आईने त्यागलेला कर्ण. असे काहींच्या बोलण्यातून आपण ऐकले असेल. सर्वच जाती धर्मीयांसाठी आधार वाटतो तो हक्काचा पोलीस. जातींमध्ये भेदभाव न मानता साऱ्यांच्याच सण उत्सवाला अगदी रात्रंदिवस संरक्षणार्थ उभा असतो आपला पोलीस बांधव. परंतु पोलीस ठाण्यातील प्रामाणिक कर्मचाऱ्यांसोबत “धना”साठी घुसमट होत असलेल्या अधिकाऱ्यांचे वागणे मात्र खूपच विचित्र सुरू असल्याची कुजबूज आहे.

जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात तर चक्क “पाटलांची” जोरदार हवा असल्याचे चित्र पाहायला मिळतेय. तर त्याच पोलीस ठाण्यात चार जण एकत्र येत “शंकर” शाळा करीत असल्याचा अनुभव अर्धा डझन कर्मचाऱ्यांना आलाय. राज्याच्या राजकारणात देशमुखी, पाटीलकी, पवार पॅटर्न करणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्राने अनुभवले आहे. आता यापाठोपाठ जातीयतेचा मुद्दा उपस्थित करत खाकीला बदनाम करणाऱ्या “अभि”नेत्यांचा नंबर अग्रस्थानी असल्याची जोरदार चर्चा वाऱ्यासारखी पसरल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Previous Post

शिवसेनेचा “आपला सेवक आपल्या दारी”

Next Post

बैल फरफटत गेला : एकजण किरकोळ जखमी : दुचाकींचेही नुकसान

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा परिषदेच्या शाळा उद्यापासून सकाळ सत्रात ; उन्हाचा पारा वाढला..!

बैल फरफटत गेला : एकजण किरकोळ जखमी : दुचाकींचेही नुकसान

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group