पलूस:- राजकारणातील पद हे मिरवण्याची नसून ते सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी असते हा उदात्त हेतू ठेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख तसेच दोस्ती पॉवर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शाहरूख संदे यांनी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली “आपला सेवक आपल्या दारी ” हा अभिनव उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी दि. १० मार्च रोजी आमनापूर ता पलूस येथून महिलांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभिनेते संदीप कुडचिकर,फरीदा संदे, वैद्यकीय अधिकारी मनीषा गटगूळ, लता निकम उपस्थित होते.
समता, बंधुता व मानवता, समाजातील, जातीभेद, मतभेद, दूर ठेवून मानवता हाच खरा धर्म याची जाणीव ठेवून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांचा पाठपुरावा करून त्या सोडवून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी दोस्ती पॉवर महाराष्ट्र राज्य आणि शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या माध्यमातून तसेच जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख शाहरुख संदे यांनी”आपला सेवक-आपल्या दारी” हा अभिनव उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील कुटुंबापर्यंत पोहचवून समस्या जाणून घेऊन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. २२ शासकीय कार्यालयातील समस्या व त्याचा प्रशासकीय पाठपुरावा करून सोडवण्यासाठी या व्यापक मोहिमेचा आरंभ महिलांच्या हस्ते करण्यात आला.तसेच यावेळी महिला दिनानिमित्त महिला मेळावा आणि महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विश्रांती शेटे, अनिता माळी, वर्षा माळी, शुभांगी निकम, सुहासिनी मोरे,सविता मतकरी ,सुनीता सावंत,भारती कदम ,जयश्री राजमाने,सरिता पाटील,निशा फडतरे , खैरून संदे, तब्बस्सुम सुतार सर्व यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.

