• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये एन. डी. आर. एफ. टीमची आपत्ती व्यवस्थापनाबाबत कार्यशाळा संपन्न

Admin by Admin
March 9, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये एन. डी. आर. एफ. टीमची आपत्ती व्यवस्थापनाबाबत कार्यशाळा संपन्न
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कुपवाड : खबऱ्या प्रतिनिधी

कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज ॲन्ड कॉमर्स आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्यात होणारे अपघात टाळण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. सदर कार्यकमासाठी एन.डी. आर. एफ. पथकाचे प्रमुख प्रमोद राय, आर. जी. यादव, सांगलीच्या अप्पर तहसिलदार अर्चना पाटील, फायर स्टेशनचे सांळुखे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे समन्वयक रफीक नदाफ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सतिश मालू यांनी केले.

यावेळी बोलताना राय म्हणाले की, कारखान्यात होणारे अपघात टाळण्यासाठी कारखान्यामध्ये असणाऱ्या उपकरणांचा वापर करणे आवश्यक आहे. उंचीवर काम करीत असताना सेफ्टी बेल्टचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. बंधिस्त जागे मध्ये असताना ज्वालाग्रही रसायन, ऑक्सीजन चे प्रमाण तपासून घेणे आवश्यक आहे. कन्व्हेअर बेल्ट काम करीत व स्कू कन्व्हेअर यांना सुरक्षा जाळी किंवा गार्ड बसविले असता अपघात टाळले जातील अशी माहिती उपस्थितांना दिली.

यावेळी यादव यांनी सी. पी. आर. (कार्डिओपल्मोनरी पुनरूत्थान) कसे करावे याचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखविले. सी. पी. आर. करताना प्रथम पल्सरेट चेक करणे, हृदयाचे ठोके तपासणे, श्वास चालू असल्याबत खात्री करून घेणे या तीन प्रमुख महत्वाच्या बाबी आहेत. यातील तीनही बाबी बंद असतील तरच सी.पी. आर. करता येते अशी महत्वपूर्ण माहिती दिली. यावेळी उपस्थित असलेल्या विविध कंपन्यातील सेफ्टी ऑफिसर यांच्याकडून कारखान्यातील संभाव्य अडचणीबाबत माहिती घेऊन त्यांना मागदर्शन केले.

यावेळी संस्थेचे संचालक दिनेश पटेल, बाश्कोचे पवन सगरे, क्वालिटी इलेक्ट्रिक -पॉवर थे सचिन कुलकर्णी, जेसन फाँटीचे जाधव सुयश फौंड्रीचे रविंद्र पाटील, शाह प्रेसिकास्टचे संजय जाधव, गोदावरी उद्योगचे प्रशांत आवळे, एक्सेला पेन्सिलचे एस.व्हीं. माळी आदीसह मोठ्या संख्येने कारखान्यातील सेफ्टी ऑफिसर, एन. डी.आर. एफ चे पथक, कामगार उपस्थित होते. आभार संस्थेचे व्यवस्थापक अमोल पाटील यांनी मानले.

Previous Post

मालगावच्या माजी पंचायत समिती सदस्यास कारावास

Next Post

शिवसेनेचा “आपला सेवक आपल्या दारी”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिवसेनेचा “आपला सेवक आपल्या दारी”

शिवसेनेचा "आपला सेवक आपल्या दारी"

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group