• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मालगावच्या माजी पंचायत समिती सदस्यास कारावास

Admin by Admin
March 9, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मालगावच्या माजी पंचायत समिती सदस्यास कारावास
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज; खबऱ्या प्रतिनिधी: मालगाव (ता. मिरज) येथे एकास धमकावून हवेत गोळीबार करून त्याच्यावर खुनी हल्ला केला होता. या प्रकरणी माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश उर्फ बाळासाहेब तुकाराम भंडारे याच्यासह साथीदारांना न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी व 1 हजार 500 रुपये दंड ठोठाविण्यात आला.

पंचायत समिती सदस्य प्रकाश उर्फ बाळासाहेब भंडारे व त्याच्या साथीदारांनी वसंत आप्पासाहेब खांडेकर यांना तुम्ही आमचे समाजातील वर्चस्व कमी करताय काय, तुम्हाला जास्त मस्ती आली आहे, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून विनापरवाना रिव्हॉल्व्हर छातीवर रोखून धमकावून त्यानंतर हवेत गोळीबार केला होता. तर रमेश तेलकिरे याने तलवारीने तोंडावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. भंडारे यांच्या अन्य साथीदारांनी समाज मंदिरासमोर असलेल्या साहित्याची तोडफोड करून नुकसान केले होते. ही घटना 2012 मध्ये घडली होती.

याबाबत वसंत खांडेकर यांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक के. बी. गवळी यांनी याबाबत तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणावर सुनावणी घेऊन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी बाळासाहेब भंडारे व त्याच्या साथीदारांना एक महिना सश्रम कारावास, सहा महिने सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड, एक वर्ष सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड व हत्यार बाळगल्या प्रकरणी आर्म ऍक्ट प्रमाणे तीन वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड अशी स्वतंत्रपणे वेगवेगळी शिक्षा ठोठावली आहे. तसेच पाचशे रुपये दंडाची भरणा न केल्यास आणखीन पंधरा दिवस फक्त सक्तमजुरी ठोठावण्यात आली आहे.

Previous Post

मिरजेत साडेचार लाखाचा गुटखा जप्त ; महात्मा गांधी पोलिसांची कारवाई.

Next Post

कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये एन. डी. आर. एफ. टीमची आपत्ती व्यवस्थापनाबाबत कार्यशाळा संपन्न

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये एन. डी. आर. एफ. टीमची आपत्ती व्यवस्थापनाबाबत कार्यशाळा संपन्न

कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये एन. डी. आर. एफ. टीमची आपत्ती व्यवस्थापनाबाबत कार्यशाळा संपन्न

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group