• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तलवारीने जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Admin by Admin
March 7, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
तलवारीने जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव : तलवारीने जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन पीडितेला जबरदस्तीने ऊस पिकाच्या शेतात नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तालुक्यात उघडकीस आली आहे.

याप्रकरणी संशयित आरोपी अजित विजय जाधव (वय 32, रा. तडसर ) याच्याविरोधात चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेचा कडेगाव तालुक्यातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , पीडित ही अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील संशयित आरोपीने 2 सप्टेंबर 2022 ते 27 जाने 2023 पर्यंत वेळोवेळी तडसर गावाच्या हद्दीत अत्याचार केला. 2 सप्टेंबर 2022 रोजी पीडितेला तिच्या घराच्या पाठीमागे असलेल्या ज्वारीच्या शेतात नेऊन व तलवारीने जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पहिल्यांदा अत्याचार केला. त्यानंतर जबरदस्तीने तिच्यासोबत अनेकवेळा अत्याचार केला.

त्यानंतर पीडिता गर्भवती राहिल्याची माहिती मिळताच 2 फेब्रुवारी संशयित आरोपीने गर्भपाताचे औषध पाण्यात मिसळून जबरदस्तीने पाजले. व इतर औषधे जबरदस्तीने खायला लावली. त्यानंतर 4 फेब्रुवारी पहाटे 3 वाजता पीडितेचा गर्भपात झाला. याप्रकरणी पीडितेने चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे करीत आहेत.

Previous Post

येवलेवाडी टोल नाक्याचे काम अंतिम टप्प्यात: लवकरच वसुली सुरू होणार

Next Post

जिल्हा परिषदेच्या शाळा उद्यापासून सकाळ सत्रात ; उन्हाचा पारा वाढला..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा परिषदेच्या शाळा उद्यापासून सकाळ सत्रात ; उन्हाचा पारा वाढला..!

जिल्हा परिषदेच्या शाळा उद्यापासून सकाळ सत्रात ; उन्हाचा पारा वाढला..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group