• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या शाळा उद्यापासून सकाळ सत्रात ; उन्हाचा पारा वाढला..!

Admin by Admin
March 7, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
जिल्हा परिषदेच्या शाळा उद्यापासून सकाळ सत्रात ; उन्हाचा पारा वाढला..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शिक्षक भारती, शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी जिल्हा परिषद शाळा बुधवार दि. ८ मार्चपासून सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

उन्हाची तीव्रता वाढत असून वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई, वीज कपात या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शाळेतील मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी शिक्षक संघ, शिक्षक भारती उर्दू संघटना, शिक्षक भारती आणि जुनी पेन्शन हक्क संघटनेकडून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी आणि शिक्षणाधिकारी गायकवाड यांच्याकडे मागणी केली होती.

त्यानुसार नगरपालिका, जिल्हा परिषद शाळा दि. ८ मार्चपासून सकाळी ७.२० वाजता सुरू होणार आहेत. मधली सुटी सकाळी साडे नऊ ते दहा असणार आहे. त्यानंतर दुपारी साडे अकरा वाजता शाळा सुटणार आहे. सकाळी पहिले दहा मिनिटे हे परिपाठला असणार आहेत.

चाचणी परीक्षा होईल; पण रविवारी नाही

पहिली, दुसरी व सहावीच्या विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेमार्फत गुणवत्ता शोध चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा रविवारी घेऊ नये, अशी शिक्षक संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार रविवारचा दिवस वगळून शाळेच्या वेळेतच परीक्षा घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी घेतला आहे.

Previous Post

तलवारीने जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next Post

दप्तर दिरंगाई प्रकरणी “या” अधिकाऱ्याला सांगली जिल्हा परिषदेने केले निलंबित..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दप्तर दिरंगाई प्रकरणी “या” अधिकाऱ्याला सांगली जिल्हा परिषदेने केले निलंबित..!

दप्तर दिरंगाई प्रकरणी "या" अधिकाऱ्याला सांगली जिल्हा परिषदेने केले निलंबित..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group