• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

विट्याचा पुढील आमदार ठाकरे गटाचाच : संजय राऊत

Admin by Admin
March 4, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
विट्याचा पुढील आमदार ठाकरे गटाचाच : संजय राऊत
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विटा : खबऱ्या प्रतिनिधी : “आम्ही जिथं जातो, तिथं बाबरी पडतेच! आपण वीट नाहीतर दगड तर मारूच. विट्याचा पुढचा आमदार शिवसेनेचाच असेल, अशा भाषेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आमदार अनिल बाबर यांच्यावर टीकास्त्र सोडले.

खा. राऊत हे सांगलीहून कराडकडे जाताना विटामार्गे गेले. यावेळी विट्यात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विटा – येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून राऊत यांनी जनतेशी संवाद साधला.

यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते वैभव पाटील, शहराध्यक्ष अविनाश चोथे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते, शिवाजी शिंदे, तालुकाप्रमुख राज लोखंडे, अॅड. संदीप मुळीक, शंकर मोहिते, संग्राम माने, अॅड. सचिन जाधव, अॅड. विजय जाधव, प्रताप सुतार, विनोद पाटील, सुभाष भिंगारदेवे, रवी कदम उपस्थित होते. राऊत म्हणाले, मी इथं येणार आहे असं समजल्यावर म्हणे स्पिकरला परवानगी दिली नाही.गावागावातले पाणी बंद केले आहे.

सगळीकडे दहशत चालू आहे. इथले आमदार तर अपात्र ठरणारच आहेत. सर्वोच्च न्यायालय त्यांना घरी बसवणारच आहे. नाहीतर जनता घरी बसवणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खुपसलेला खंजीर विट्यातली जनता विसरणार नाही. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. बाळासाहेब ठाकरे वरून पाहतायत. ज्यांनी आपल्याला अभिमान शिकवला, अस्मिता दिली. त्यांच्याशी बेईमानी करणारा कोणीही असो त्याला सोडायचे नाही. निवडणुका लागल्यावर विट्याचा पुढचा आमदार शिवसेनेचाच होणार, असेही खा. राऊत यांनी सांगितले.

यावेळी महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट शिवसेना यांच्या अनेक कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

Previous Post

येतगाव सोसायटीचा कारभार सचिवांशिवाय ; दोन महिन्यांपासून सचिव नाहीत..!

Next Post

येवलेवाडी टोल नाक्याचे काम अंतिम टप्प्यात: लवकरच वसुली सुरू होणार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाड मध्ये नशेच्या गोळ्या, गांजा विक्रीचा धंदा जोमात..? व्यसनाधिनता भिनली तरुणाईच्या रोमारोमात..!!

येवलेवाडी टोल नाक्याचे काम अंतिम टप्प्यात: लवकरच वसुली सुरू होणार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group