• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दहावी आणि बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार ; शिक्षणाधिकाऱ्याना दिले निवेदन.

Admin by Admin
February 28, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
दहावी आणि बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार ; शिक्षणाधिकाऱ्याना दिले निवेदन.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : माध्यमिक शाळांमध्ये २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी आणि सर्व शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार घातला आहे.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.

शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुधीर माने, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे आनंदराव पिसाळ, मुख्याध्यापक संघाचे अशोक जाधव, शिक्षकेतर संघटनेचे प्रवीण शिंदे आदींच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी आंदोलन केले. निवेदनात म्हटले की, माध्यमिक शाळांमध्ये २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही. परिणाम त्यांना सेवानिवृत्तीचे जीवन जगताना खूप अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

शासनाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच सर्व शाळांना पगार आणि इमारत देखभाल दुरुस्तीसाठी १०० टक्के अनुदान मिळाले पाहिजे. या प्रमुख दोन मागण्यांसाठीच दहावी आणि बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर आम्ही बहिष्कार घालणार आहे, असा इशाराही शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुधीर माने यांनी दिला आहे.

Previous Post

कडेगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचा राज्यात डंका

Next Post

गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ; राज्य सरकार कारवाईवर ठाम.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलिस निरीक्षक निंभोरे साहेब, तालुक्यातील अवैध धंदे अगोदर बंद करा..!

गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ; राज्य सरकार कारवाईवर ठाम.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group