• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचा राज्यात डंका

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक

Admin by Admin
February 28, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष, शैक्षणिक
1 min read
0
कडेगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचा राज्यात डंका
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव:- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यावतीने शिक्षण विभागात अत्यंत प्रतिष्ठेची व संशोधनाला चालना देणारी स्पर्धा सन २०२२- २३ या कालावधीत घेण्यात आली. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत “अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी” या गटातून कडेगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनिस मुसा नायकवडी यांना महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक तर “प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून वनिता मल्हारी मोरे यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच विभागातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत शिक्षण क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेची व संशोधनाला चालना देणारी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी या गटात कोळे तालुका कराड गावचे सुपुत्र व कडेगाव पंचायत समिती जिल्हा सांगली येथील गटशिक्षणाधिकारी अनिस मुसा नायकवडी यांनी महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला अनिस नायकवडी यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून मॉडेल स्कूल ची निर्मिती हा नवोपक्रम सादर केला होता. कडेगाव तालुक्यामध्ये स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची वाढलेली गुणवत्ता व शाळेचे कामकाज याची दखल राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आली . त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक संशोधन परिषद पुणे येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद की संचालक कौस्तुभ दिवेगावकर सहसंचालक रमाकांत काटमोरे संशोधन विभाग प्रमुख कमलादेवी आवटी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या उज्वल यशाबद्दल सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक श्री महेश पालकर प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक श्री देविदास कुलाळ तसेच माध्यमिक विभागाचे संचालक हारून आतार जिल्हा परिषद सांगली चे शिक्षण अधिकारी मोहनराव गायकवाड तसे शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. यापूर्वीही सन २००३ मध्ये अनिस नायकवडी यांनी प्राथमिक शिक्षक असताना नवोपक्रम स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला होता

खेराडे वांगी शाळेतील वनिता मल्हारी मोरे यांनी “बाहुली नाट्य अध्ययन अध्यापनाचे प्रभावी माध्यम “हा नवोपक्रम सादर केला होता. यांच्या नवोपक्रमास राज्यातील १० निवडक नवोपक्रमातून प्रथम क्रमांक मिळाला. वनिता मोरे यांनी शैक्षणिक व शिक्षकांची गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड, डायटचे प्राचार्य रमेश होसकोटी, अधिव्याख्याता राजेंद्र भोई, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, अधिव्याख्याते, कडेगावचे गटविकास अधिकारी बी.एस. साळवे तालुक्यातील सर्व शिक्षक-शिक्षिका, विषयतज्ज्ञ, बी. आर. सी. स्टाफ, तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

Previous Post

trial 2

Next Post

दहावी आणि बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार ; शिक्षणाधिकाऱ्याना दिले निवेदन.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दहावी आणि बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार ; शिक्षणाधिकाऱ्याना दिले निवेदन.

दहावी आणि बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार ; शिक्षणाधिकाऱ्याना दिले निवेदन.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group