• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत गांजा तस्करी प्रकरणी चौघांची टोळी जेरबंद ; २० लाखांचा गांजा जप्त करीत एलसीबीची मोठी कारवाई.

Admin by Admin
February 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत गांजा तस्करी प्रकरणी चौघांची टोळी जेरबंद ; २० लाखांचा गांजा जप्त करीत एलसीबीची मोठी कारवाई.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : गांजाची तस्करी करणाऱ्या चारजणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कवठेपिरान परिसरातील एका शेतात जेरबंद केले.

त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेला २० लाख ४० हजार रुपयांचा १०२ किलो गांजा जप्त केला. अदिल नासीर शहापुरे (वय ३३, बाबर गल्ली, कोल्हापूर रस्ता, सांगली), सचिन बाबासाहेब चव्हाण (३१, रा. जि. प. शाळेजवळ कवठेपिरान, ता. मिरज), मयुर सुभाष कोळी (३३ रा. शंभर फुटी रस्ता, सांगली) आणि मतीन रफिक पठाण (३१, रा. काटकर गिरणीसमोर, राधाकृष्ण वसाहत सांगली) अशी अटक केलेल्या तस्कराची नावे आहेत. त्यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गांजाची तस्करी रोखण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. पथकातील कर्मचारी आर्यन देशिंगकर यांना कवठेपिरान ते सर्वोदय साखर कारखाना या रस्त्यावरील बाबासो चव्हाण यांच्या शेतामध्ये काहीजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी बुधवारी सापळा लावला होता. काही वेळात परिसरात दोन वाहने थांबल्याचे निदर्शनास आले. त्यामधील चौघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी दोन्ही वाहने आणि चौघांची झडती घेतली असता वाहनांमध्ये विक्रीसाठी आणलेला २० लाख ४० हजाराचा वाळलेला गांजा आढळला. चौघांनाही ताब्यात घेवून त्यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी गांजासह ८ लाख ५० हजार रुपये किंमतीची दोन चारचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर, पोलीस कर्मचारी जितेंद्र जाधव, राजू शिरोळकर, अमोल ऐदाळे, राहुल जाधव, संकेत मगदूम, प्रविण शिंदे, गौतम कांबळे, मच्छींद्र बर्डे आदींनी सहभाग घेतला.

Previous Post

कामगार साहित्य संमेलनासाठी मिरज नगरी सज्ज : कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांची माहिती.

Next Post

मोठी बातमी | अंकलखोपच्या पीक संरक्षण संस्थेत बोगस सदस्यांची नोंद.? कारवाईची मागणी.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | अंकलखोपच्या पीक संरक्षण संस्थेत बोगस सदस्यांची नोंद.? कारवाईची मागणी.

मोठी बातमी | अंकलखोपच्या पीक संरक्षण संस्थेत बोगस सदस्यांची नोंद.? कारवाईची मागणी.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group