• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आटपाडी तहसिलमधील सहायक लाच स्विकारताना जाळ्यात : चॅप्टर केस निकाली काढण्यासाठी घेतली लाच

Admin by Admin
February 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
आटपाडी तहसिलमधील सहायक लाच स्विकारताना जाळ्यात : चॅप्टर केस निकाली काढण्यासाठी घेतली लाच
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली, : चॅप्टर केसमध्ये पर्सनल बॉण्डवर सोडण्यासाठी व चॅप्टर केस निकाली काढण्यासाठी तीन हजार रुपयाची लाच स्विकारताना आटपाडी तहसिलमधील महसूल सहायक महेबुब नबिलाल बागवान (वय ४२ वर्ष, रा. दत्तनगर, मज्जीद समोर आटपाडी, मुळ रा. मु.पो. लोहारा बुद्रुक इंदिरानगर, जि. उस्मानाबाद) याला रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

अधिक माहिती अशी, तक्रारदार यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने चॅप्टर केसची सुनावणी निवासी नायब तहसिलदार आटपाडी यांच्या समक्ष सुरु आहे. सुनावणीमध्ये वरीष्ठांना सांगुन चॅप्टर केसमध्ये पर्सनल बॉण्डवर सोडण्यासाठी व चॅप्टर केस निकाली काढण्यासाठी चॅप्टर केस टेबलचे काम पाहणारा महसुल सहायक बागवान याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला.

तक्रारीनुसार पडताळणी केली असता त्यामध्ये बागवान याने पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती तीन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. सदरची लाच दोन दिवसात आणुन देण्यास सांगितले होते.

आज बागवान यांच्याविरुद्ध आटपाडी तहसिलदार कार्यालय आवारात सापळा लावला असताना बागवान याला तीन हजार रुपये लाच स्विकारल्यावर रंगेहात पकडण्यात आले. बागवान याच्याविरुध्द आटपाडी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. उपाधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, अंमलदार धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अजित पाटील, सीमा माने, सलीम मकानदार, राधीका माने, ऋषीकेश बडणीकर, अतुल मोरे, सुदर्शन पाटील, अंनिस वंटमुरे यांनी कारवाई केली.

Previous Post

सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर केंद्रीय रेल्वे मंत्र्याशी सकारात्मक चर्चा

Next Post

वन विभागातील ५८ लाखांच्या बोगस कामांचा डाव उधळला.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वन विभागातील ५८ लाखांच्या बोगस कामांचा डाव उधळला.

वन विभागातील ५८ लाखांच्या बोगस कामांचा डाव उधळला.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group