• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर केंद्रीय रेल्वे मंत्र्याशी सकारात्मक चर्चा

कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री मा. ना. डॉ. सुरेश खाडे

Admin by Admin
February 22, 2023
in मंत्रालय
1 min read
0
सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर केंद्रीय रेल्वे मंत्र्याशी सकारात्मक चर्चा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली, दि. 21 : सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याची, माहिती राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री सुरेश खाडे यांनी आज येथे दिली.

येथील संचार भवनात श्री खाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत सांगली जिल्ह्यात रेल्वेशी संबंधित विषयांवर चर्चा केली असून संबंधित निवेदने ही श्री खाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांना यावेळी दिले.

यामध्ये सांगली जिल्ह्यातील आरग-मिरज येथे रेल्वे अंडर ब्रिज (RUB) असा रेल्वेचा प्रस्ताव असून यासाठीचे कंत्राट देण्याकरीता निविदा काढण्यात आले आहेत. या प्रक्रियेला रद्द करून या ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रिज बांधण्यात यावे, अशी मागणी श्री खाडे यांनी केंद्रीय मंत्री श्री वैष्णव यांच्याकडे केली. केंद्रीय रेल्वे मंत्री श्री वैष्णव यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण करण्याबाबतचे तत्काळ निर्देश दिले असल्याचे श्री खाडे यांनी सांगितले.

यासह सांगली जिल्ह्यातील येरळा नदीवरील रेल्वेच्या जागेतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीचे रस्ते रेल्वे विभागाकडून बांधावे, अशी मागणीही केली. सांगली येथील रेल्वे स्थानकाचे शेड अपूर्ण असून ते पूर्ण व्हावे. याशिवाय सीएसटीएम कोल्हापूर-तिरूपती महालक्ष्मी एक्सप्रेस ही रोज चालणारी गाडीचे नुतनीकरण व्हावे. काही गाडयांचा थांबा सांगली रेल्वे स्थानकांवर व्हावा सांगली आणि परिसरातील लोकांची अध‍िक प्रवास असलेल्या स्थानकांपर्यंत नवीन रेल्वे गाडया सुरू करण्याची मागणी श्री खाडे यांनी यावेळी केली.

मिरजमध्ये ‘क्रिडा संकुल’ची केंद्रीय क्रिडा मंत्री यांच्याकडे मागणी

मिरज येथे क्रिडा संकुल असावे असे निवेदन आज सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री श्री खाडे यांनी केंद्रीय युवक कल्याण आणि क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे दिले. खेलो इंडिया अंतर्गत मिरज येथे क्रिडा संकुलाची मागणी श्री खाडे यांनी केंद्रीय क्रिडा मंत्री यांच्याकडे केली. केंद्रीय क्रिडा मंत्री यांनी याबाबत लवकर सकारात्मक निर्णय घेऊ, अशी माहिती बैठकीनंतर श्री खाडे यांनी दिली.

Previous Post

रेल्वे रुळावर एकाचा मृत्यू ; ग्रामीण पोलिसात नोंद.

Next Post

आटपाडी तहसिलमधील सहायक लाच स्विकारताना जाळ्यात : चॅप्टर केस निकाली काढण्यासाठी घेतली लाच

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आटपाडी तहसिलमधील सहायक लाच स्विकारताना जाळ्यात : चॅप्टर केस निकाली काढण्यासाठी घेतली लाच

आटपाडी तहसिलमधील सहायक लाच स्विकारताना जाळ्यात : चॅप्टर केस निकाली काढण्यासाठी घेतली लाच

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group