मिरज प्रतिनिधी /मिरज पंढरपूर रेल्वे मार्गावर रेल्वे खाली तरुण आल्याने जागीच ठार झाला. मयत तरुण सांगली येथील आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद केली आहे.
याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की, मिरज पंढरपूर रेल्वे मार्ग, राम नगर गेट नंबर 556 जवळ रेल्वेने धडक दिल्याने छिन विच्छिन्न अवस्थेत एक जण जागीच ठार झाला. रेल्वे मार्गावर मृतदेह पडल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेहाच्या खिशामध्ये सापडलेले कागद पत्रानुसार मृतदेहाची ओळख पटली.
सुशांत विश्वनाथ कदम (वय 40) राहणार सांगली, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रिक्षा चालक म्हणून व्यवसाय करत होता. त्याच्यावर मानसिक उपचार सुरू होते. घरातून न सांगता बाहेर पडला होता. आज मिरज पंढरपूर रेल्वे मार्गावर त्याचा मृतदेह सापडल्याची पोलिसांनी नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी पोलीसात धाव घेतली होती.

