• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांचे वाढदिवसानिमित्त २०० महिलांना मोफत देवदर्शन

दोस्ती पॉवरचे अध्यक्ष शाहरुख भैय्या संदे यांची माहिती : २० ते २२ फेब्रुवारी सहलीचे आयोजन

Admin by Admin
February 12, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, विशेष
1 min read
0
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांचे वाढदिवसानिमित्त २०० महिलांना मोफत देवदर्शन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पलूस:- शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने पलूस तालुक्याच्या आमनापूर गावातील २०० माता भगिनींना मोफत देवदर्शनासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती दोस्ती पॉवर ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष शाहरुख भैय्या संदे यांनी दिली. यामध्ये शिर्डी साई बाबा, शनी शिंगणापूर, सोनाई मंदिर, रांजणगाव, मोरगाव, नारायणगाव व प्रति बालाजी या तिर्थ क्षेत्रांना भेटी दिल्या जाणार आहेत. २० फेब्रुवारी रोजी सदर देवदर्शन सहल प्रस्थान होणार आहे तर प्रथम येणाऱ्या २०० महिलांना संधी दिली जाणार असल्याची माहिती संदे यांनी दिली.

यावेळी बोलताना शाहरुख संदे म्हणाले, आमचे नेते आणि शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांचा १६ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असतो. वाढदिवसाच्या निमित्ताने आमनापूर गावातील माता भगिनींना देवदर्शन व्हावे, माता भगिनींनी देवदर्शन घेतल्या नंतर बापूंना उदंड आयुष्यासाठी शुभाशीर्वाद द्यावेत आणि बापूंचा वाढदिवस अविस्मरणीय व्हावा ह्या उदात्त हेतूने सदर सहल आयोजित करण्यात आली आहे. या सहलीमध्ये प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या २०० महिलांना संधी दिली जाणार आहे. सदर सहलीस पात्र होणाऱ्या महिलांनी सहलीसाठी येताना फक्त स्वतःसाठी आवश्यक असणारी कपडे घ्यावयाची आहेत. सदर सहलीत सहभागी होणाऱ्या सर्व महिलांच्या चहा, नाश्ता, जेवण तसेच राहण्याची सोय दोस्ती पॉवर ग्रुप तर्फे करण्यात येणार आहे.सदर सहलीचे प्रस्थान सोमवार दि. २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी संजय बापू विभूते यांचे हस्ते श्रीफळ वाढवून होणार असून मंगळवार दि. २१ रोजी शनि शिंगणापूर येथे सकाळी पोहचणार आहे. शनी शिंगणापूर दर्शन नंतर सोनाई मंदिर दर्शन व त्यानंतर शिर्डी साई बाबा दर्शन होईल. मंगळवार मुक्काम शिर्डी येथे होईल.

बुधवार दि. २२ रोजी शिर्डी येथून प्रस्थान होईल व त्या दिवशी रांजणगाव, मोरगाव, नारायणगाव व प्रती बालाजी दर्शन करून रात्री आमनापूर येथे सहल परत येईल. या देवदर्शन सहलीसाठी इच्छुक महिलांनी स्वतःचा एक फोटो आणि आधारकार्ड झेरॉक्स घेऊन श्रीमती फरीदा महमूद संदे(माँसाहेब) (संपर्क क्रमांक. ८८५६८८७७५३) यांच्याशी संपर्क करावा व आपली नावनोंदणी करावी असं आवाहन शाहरुख संदे यांनी केलं आहे.

Previous Post

अवैध गौण खनिज वाहतूक कारवाईत शासकीय निर्देश फाट्यावर

Next Post

शासकीय निर्देश फाट्यावर मारून कारवाई प्रकरण, महसूल कर्मचाऱ्यांमध्ये रोष

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोन शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

शासकीय निर्देश फाट्यावर मारून कारवाई प्रकरण, महसूल कर्मचाऱ्यांमध्ये रोष

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group