• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शासकीय निर्देश फाट्यावर मारून कारवाई प्रकरण, महसूल कर्मचाऱ्यांमध्ये रोष

गोपनीय खबऱ्याच्या वृत्तानंतर खळबळ

Admin by Admin
February 12, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो, शोध पत्रकारिता
1 min read
0
प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोन शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रात्रभर जागून कारवाई आणि वरिष्ठांकडून तडजोड?

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी

सांगली:- अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणात तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी पकडून आणलेल्या वाहनांवर शासकीय निर्देशानुसार कारवाई होणे अपेक्षित असताना सर्व निर्देश फाट्यावर मारून नाममात्र (दाखवण्यासाठी) कारवाई केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर गोपनीय खबऱ्याने याबाबत सडेतोड वृत्तांकन केले आणि खळबळ उडाली तर महसूल कर्मचाऱ्यांमध्ये रोषाच वातावरण तयार झालं आहे. आम्ही रात्रभर जागून कारवाई करायची आणि कार्यालयात तडजोड केली जाते की काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर आता या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

पलूस तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करीत असताना तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी काही वाहने पकडून संबंधित वाहने वाहतूक करीत असलेले गौण खनिज अवैध आहे याची खातरजमा करून तहसील कार्यालयात आणून लावली होती. मात्र पुढील कारवाई शासकीय निर्देशानुसार दंड वसूल करून होणे अपेक्षित असताना अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांच्या सोयीनुसार दंड आकारणी करून कारवाई करून सोडली गेल्याचं कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. याबाबत खबऱ्याने सडेतोड वृत्तांकन केल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली आणि आता महसूल कर्मचाऱ्यांमध्ये रोषाच वातावरण तयार झालं आहे.

अशा कारवाया फक्त पलूस नव्हे तर इतर तालुक्यात ही झाल्या असाव्यात अशी शंका व्यक्त केली जात आहे. अवैध गौण खनिज उपसा अथवा वाहतूक प्रकरणात स्थानिक कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाते म्हणून तलाठी मंडळ अधिकारी रात्रभर जागून कारवाई करतात आणि प्रत्यक्षात शासकीय निर्देशा नुसार कारवाई न होता निर्देश फाट्यावर मारले जातात हे समजल्यानंतर तलाठी मंडळ अधिकाऱ्यांमध्ये रोषाच वातावरण तयार झालं आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

Previous Post

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांचे वाढदिवसानिमित्त २०० महिलांना मोफत देवदर्शन

Next Post

जतमधील लोकअदालतीस वकिलांनी फिरवली पाठ.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जतमधील लोकअदालतीस वकिलांनी फिरवली पाठ.?

जतमधील लोकअदालतीस वकिलांनी फिरवली पाठ.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group