• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

विटा बस स्टॅन्डवर “त्या” महिलेला अटक

Admin by Admin
February 9, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
विटा बस स्टॅन्डवर “त्या” महिलेला अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विटा; खबऱ्या प्रतिनिधी/ विट्यात बस स्टॅन्डवर सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला पकडले. अनु साई जाधव ( वय ४०, शिवाजीनगर गणपती मंदीराजवळ जळगांव, जि. जळगांव ) असे संशयित महिलेचे नांव आहे.तिला विटा पोलिसांनी अटक केली आहे

याबाबत पोलिसांनी सांगितले की विटा बस स्थानकात काल संशयितरित्या एक महिला फिरत असल्याची माहिती पोलिस हणमंत लोहार व महेश देशमुख यांना मिळाली. त्यानुसार पेट्रोलिंग करत असताना बस स्थानकात संशयित रित्या फिरणाऱ्या अनु जाधव या महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे सखोल चौकशी केली असता गर्दीचा फायदा घेत विटा – कोल्हापूर बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्समधून रोख रक्कम व सोन्याचे गंठण चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान, फातिमा सलीम मुलाणी ( किणी वाठार, ता. हातकणंगले ) या महिलेने विटा बस स्थानकात बसमध्ये चढत असताना रोख दीड हजार रुपये व दोन लाख त्रेचाळीस हजार रूपयांचे ४८.६६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण कोणीतरी चोरल्याची फिर्याद ( ता. ६ ) विटा पोलिसात दिली होती. मुलाणी यांची रोख रक्कम व सोन्याचे गंठण चोरल्याची कबुली संशयित अनु जाधव या महिलेने दिली. तिच्या ताब्यातील दागिने जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

सांगली जिल्ह्यात खळबळ: सहावीमध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यावर शिपायाने केला अनैसर्गिक बलात्कार.

Next Post

सोनीत मध्यरात्री चोरट्यांनी दवाखाने, औषध दुकाने आणि बंद घरे फोडली

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सोनीत मध्यरात्री चोरट्यांनी दवाखाने, औषध दुकाने आणि बंद घरे फोडली

सोनीत मध्यरात्री चोरट्यांनी दवाखाने, औषध दुकाने आणि बंद घरे फोडली

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group