• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्ह्यात खळबळ: सहावीमध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यावर शिपायाने केला अनैसर्गिक बलात्कार.

तासगावातील दिव्यांग निवासी विद्यालयातील धक्कादायक प्रकार

Admin by Admin
February 8, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोन शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

तासगांव : खबऱ्या प्रतिनिधी / तासगाव तालुक्यातील कुमठे गावातील दिव्यांग विद्यालयात राखणदार असणाऱ्या शिपायाने एका दिव्यांग मुलावर अनैसर्गिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नराधम राखणदार यास तासगाव पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, रविवार दि.५ रोजी रात्री साडेअकरा वाजता कुमठे येथील जयशंकर निवासी दिव्यांग विद्यालय मध्ये सर्वजण झोपले असताना, नराधम शिपायाने दिव्यांग असलेल्या सहावी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाला पाठीमागून मिठी मारली व त्याच्या तोंडावर हाताने दाबून अंनैसर्गिक अत्याचार केला. पीडित अल्पवयीन दिव्यांग हा जोर जोरात ओरडू लागला. तेव्हा आवाजाने एक दोन विद्यार्थी उठले, यावेळेस नराधमाने पीडित व त्याला वाचवण्यासाठी आलेल्या सहकारी दिव्यांग विद्यार्थी यांना मारहाण करून “कोणास सांगितले तर आणखी मारेन” अशी धमकीच दिली.

याप्रकरणी नराधम शिपाई संदीप दत्तात्रय भोकरे (रा. तासगाव) याला अटक करण्यात आली आहे. संदीप भोकरे यांच्यावर भा.द. वि. कलम ३७७, ३२३, ५०६, सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,५ (एफ), ५ के, ६, ८, १२ सह अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ चे कलम ९२ प्रमाणे तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी तपास करीत आहेत.

Previous Post

आफ्रिदीवर दोन वर्षांची बंदी ; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा निर्णय

Next Post

विटा बस स्टॅन्डवर “त्या” महिलेला अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
विटा बस स्टॅन्डवर “त्या” महिलेला अटक

विटा बस स्टॅन्डवर "त्या" महिलेला अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group