• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सोनीत मध्यरात्री चोरट्यांनी दवाखाने, औषध दुकाने आणि बंद घरे फोडली

Admin by Admin
February 9, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सोनीत मध्यरात्री चोरट्यांनी दवाखाने, औषध दुकाने आणि बंद घरे फोडली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज; खबऱ्या प्रतिनिधी / सोनी (ता. मिरज) येथे चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. एका रात्रीत 12 ठिकाणी चोऱ्या झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. चोरट्याने 58 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला.

याप्रकरणी डॉ. उदयसिंह बाळासाहेब जगदाळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोनीमध्ये बुधवारी पहाटे दवाखाने, औषध दुकाने आणि बंद घरे चोरट्याने फोडून अक्षरशः धुमाकूळ घातला. यावेळी चोरट्याने उदयसिंह जगदाळे यांचा दवाखाना फोडून तीस हजार रुपयांची रोकड लंपास केली. गावातील उल्हास पाटील यांच्या घरातील 28 हजार पाचशे रुपये किमतीचे मंगळसूत्र, चांदीची मूर्ती व चांदीचा करंडा घेऊन पोबारा केला.

चोरट्याने विकास भट, नंदकुमार जगन्नाथ पाटील, शिवाजी पाटील बाळासाहेब पाटील यांचे घर फोडले. तसेच डॉ. जगदाळे, डॉ. विकास लेंगरे, डॉ. साहिल नदाफ, डॉ. कुंभार यांचा दवाखाना फोडला. तसेच तुषार चौगुले यांचे औषध दुकान, ज्ञानदीप औषध दुकान व प्रदीप सूर्यवंशी यांचे स्वराज्य औषध दुकान चोरट्याने फोडले. यासह राहुल कुंभार यांचे जनरल स्टोअर्स दुकान देखील यावेळी चोरट्याने फोडले.

त्यानंतर चोरट्याने गावातील जनरल स्टोअर्स दुकानाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. परंतु या जनरल स्टोअर्स मध्ये देखील चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. यावेळी दुकानाचे मालक राहुल कुंभार हे कुटुंबासमवेत दुकानातील पाठीमागच्या बाजूस असणाऱ्या घरात झोपले होते. परंतु त्यांना चोरीचा सुगावा देखील लागला नाही.

चोरट्याने सोनी गावातील दवाखाने, औषध दुकाने आणि घर टार्गेट केले होते. चोरट्याचे कृत्य डॉ. सचिन कुंभार व स्वराज्य औषध दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरा चित्रित झाले आहे.

चोरट्याने गावात एकाच रात्री 12 ठिकाणी चोऱ्या केल्याचे बुधवारी (दि. ८) सकाळी उघडकीस आले. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना माहिती मिळतात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख पथकासह पाहणी केली याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

फक्त दवाखाने आणि औषध दुकाने टार्गेट

सोनी मध्ये चोरट्याने दवाखाने आणि औषध दुकानेच टार्गेट केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चोरट्याने फोडलेले एका औषध दुकानासमोर ज्वेलरी चे दुकान असताना देखील चोरट्याने ज्वेलरी दुकान फोडण्याचे सोडून दवाखाने आणि औषध दुकानांनाच टार्गेट केले होते.

चोरट्याची पूर्ण दक्षता : श्वान घुटमळले

सोनी मध्ये चोरी करत असताना चोरट्याने पूर्णपणे दक्षता घेतल्याचे दिसून येते. चोरट्याने तोंडावर मास्क व हाताला ग्लोज घातले होते. त्यामुळे श्वान देखील घुटमळले. चोरट्याचे एका सीसीटीव्ही चित्रीकरण झाले असून पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

Previous Post

विटा बस स्टॅन्डवर “त्या” महिलेला अटक

Next Post

कोट्यवधींच्या किंमतीची माशाची उलटी, तस्करीसाठीही नाही पुरली..! एलसीबीच्या शिंदे पथकाची कौशल्यपूर्ण कामगिरी सर्वांच्या मनात भरली..!!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोट्यवधींच्या किंमतीची माशाची उलटी, तस्करीसाठीही नाही पुरली..! एलसीबीच्या शिंदे पथकाची कौशल्यपूर्ण कामगिरी सर्वांच्या मनात भरली..!!

कोट्यवधींच्या किंमतीची माशाची उलटी, तस्करीसाठीही नाही पुरली..! एलसीबीच्या शिंदे पथकाची कौशल्यपूर्ण कामगिरी सर्वांच्या मनात भरली..!!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group