• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय बालिका ठार

Admin by Admin
February 7, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय बालिका ठार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज; खबऱ्या प्रतिनिधी/ शहरातील झारीबाग परिसरातील एका अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने यशवी निलेश देशमाने या चार वर्षाच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घरात कोणी नसताना ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मिरजेतील क्षकिरण तज्ञ डॉ. निलेश देशमाने हे झारीबाग परिसरात असणाऱ्या एका अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर राहतात. डॉ. देशमाने यांना दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी आजारी असल्याने देशमाने दाम्पत्याने सोमवारी रात्री तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. मात्र यावेळी रुग्णालयात जात असताना त्यांची लहान मुलगी यशवी ही झोपेत असल्याने डॉ. देशमाने यांनी घराला बाहेरून कुलूप लावून गेले. परंतु ते बाहेर जात असताना गडबडीत गॅलरीचा दरवाजा मात्र बंद करण्यास विसरले होते.

थोड्या कालावधीनंतर यशविला जाग आली. ती पालकांना शोधत गॅलरीत गेली. त्याचवेळी ती पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मंगळवारी पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस याबाबत तपास करण्यात येत आहे.

Previous Post

मेगा ब्लॉकमुळे ९ रोजी कोयना एक्सप्रेस रद्द

Next Post

औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेत तुफान राडा ; मिरवणुकीतल्या डीजेवरून कार्यकर्ते संतप्त.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेत तुफान राडा ; मिरवणुकीतल्या डीजेवरून कार्यकर्ते संतप्त.

औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेत तुफान राडा ; मिरवणुकीतल्या डीजेवरून कार्यकर्ते संतप्त.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group