• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेत तुफान राडा ; मिरवणुकीतल्या डीजेवरून कार्यकर्ते संतप्त.

Admin by Admin
February 7, 2023
in क्राईम, राजकीय
1 min read
0
औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेत तुफान राडा ; मिरवणुकीतल्या डीजेवरून कार्यकर्ते संतप्त.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

औरंगाबाद, : खबऱ्या प्रतिनिधी/ आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या शिवसंवाद यात्रेदरम्यान जोरदार राडा झाला आहे. रमाई जयंती असल्यामुळे गावात पूर्वनियोजित मिरवणूक होती.

मिरवणूक आणि सभा एकाच वेळी एकाच ठिकाणी आल्याने हा गोंधळ निर्माण झाला. सभास्थळी स्टेज मागून मिरवणूक जात होती, तेव्हा डीजेचा आवाज कमी करायला लावल्याने मिरवणुकीतील कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. आदित्य ठाकरे यांनी पूर्ण सुरक्षा यंत्रणेमध्ये भाषण उरकलं. सभा संपल्यानंतर गाडीत बसून जातानाही मिरवणुकीतल्या संतप्त कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंना अडवण्याचा प्रयत्न केला.

तसंच संतप्त कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर ठोसे मारले. मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना गावाच्या बाहेर नेण्यात आलं. आदित्य ठाकरे गेल्यानंतरही बराच वेळ गावात गोंधळ सुरू होता. आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर प्लास्टिकचे दोन पाईप फेकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या राड्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एकमेकांना समजून घ्यावं लागतं. काही कारणास्तव डीजे बंद झाला असेल, मी त्यांची माफी मागितली. शिवशक्ती भीमशक्ती आज एक आहे, आम्ही संविधानासाठी लढत आहोत. काही अडचण झाली असेल तर माफी मागतो. डीजे बंद झाला असेल 5-10 मिनीटांसाठी, मी माईकवरूनही डीजे चालू द्या, म्हणून सांगितलं,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Previous Post

मिरजेत पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय बालिका ठार

Next Post

Mumbai crime | शाब्बास पोलिसांनो, डॉक्टर – नर्स बनून आरोपीला पकडले, अन् दगडांच्या वर्षावात ८०० मीटर खेचत नेले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Mumbai crime | शाब्बास पोलिसांनो, डॉक्टर – नर्स बनून आरोपीला पकडले, अन् दगडांच्या वर्षावात ८०० मीटर खेचत नेले

Mumbai crime | शाब्बास पोलिसांनो, डॉक्टर - नर्स बनून आरोपीला पकडले, अन् दगडांच्या वर्षावात ८०० मीटर खेचत नेले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group