• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

…अन् पत्नीनेचं दिली पतीची सुपारी! अमित भोसलेंच्या खुनाचा सातारा पोलिसांकडून उलगडा…!

Admin by Admin
February 4, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
…अन् पत्नीनेचं दिली पतीची सुपारी! अमित भोसलेंच्या खुनाचा सातारा पोलिसांकडून उलगडा…!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सातारा (प्रतिनिधी) – सोमवार दि. 24 जानेवारी रोजी मध्यरात्रीही शहरालगत वाढे फाटा येथे वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित आप्पासाहेब भोसले (वय 38, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांचा फायरिंग करत गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला होता.

यावेळी हल्लेखोरांनी एकूण सहा गोळ्या भोसले यांच्यावर झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा धारदार शस्त्राने गळा चिरला होता. या घटनेने सातारा शहरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयितांचा शोध घेत होते.

याप्रकरणी पोलिसांनी अमित भोसले यांची पत्नी रागिनी अमित भोसले यांच्यासह सुरज ज्ञानेश्‍वर कदम (रा.खेड,सातारा), अभिषेक विलास चतुर (रा.नांदगिरी, ता.कोरेगाव), शुभम हिंदुराव चतुर (रा. कोरेगाव,सध्या पुणे), राजू भिमराव पवार (रा.पंताचा गोट,सातारा) सचिन रमेश चव्हाण (रा.मुळशी, पुणे) यांना अटक करून एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भोसले यांचे असलेले विवाहबाह्य संबध याच्यामुळे पत्नीने खुनाची सुपारी दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर,डीवायसपी मोहन शिंदे, पोलीस निरीक्षक अरूण देवकर, विश्‍वजीत घोडके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमित भोसले यांचा साताऱ्यात गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवार दि.24 जानेवारी रोजी रात्री ते त्यांच्या मैत्रिणीसोबत कारमधून वाढे फाटा येथे जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांची मैत्रीण कारमध्ये बसली असताना अमित हे हात धुण्यासाठी गेले गेले होते. त्यावेळी दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांचा गळा चिरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा प्रकार गाडीत असलेल्या त्यांच्या मैत्रिणीच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड केला. परंतु तोपर्यंत हल्लेखोर तेथून पसार झाले होते. या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिस, सातारा शहर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा वाढे फाट्याकडे रवाना झाला होता.

पोलिसांनी तातडीने वाढे फाटा परिसर पिंजून काढुन परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासल्यावर त्यांना संशयितांची चहरेपट्टी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरूवात केली होती. मात्र, संशयित हे सातारा, पुणे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, लातूर,अलिबाग,इंदोर, उज्जैन याठिकाणी फिरत असल्याने नेमके लोकेशन मिळण्यास पोलिसांना अडचण येत होती.

दरम्यान या खुनप्रकरणातील काही संशयित हे गोवा राज्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना मिळाल्याने त्यांनी भुईंजचे सपोनि रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमून तातडीने कारवाईच्या सुचना केल्या होत्या. मात्र, गर्जेसंह पथकाला गोव्यात पोहचण्यास वेळ लागणार असल्याने एसपी समीर शेख यांनी उत्तर गोवा येथील एसपींशी चर्चा करून संशयितांना ताब्यात घेण्यास विनंती केली होती. त्यानुसार गोवा पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले व सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर मयत भोसलेंची पत्नी रागिनी भोसले यांनी सुपारी दिल्यानेच खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी रागिनी यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशीला सुरूवात केली. पती अमित याचे विवाहबाह्य संबध असल्याने तो सतत मारहाण करत असल्यानेच त्याच्या खुनाची सुपारी दिल्याची कबुली रागिनी यांनी दिली असून पुढील तपास सातारा तालुका पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक बापू बांगर, डीवायएसपी मोहन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, निलेश काटकर, गणेश कापरे, मोहन पवार, मयुर देशमुख, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे, अनिकेत जाधव, सुशांत कदम व सातारा तालूका पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार राजेंद्र वंजारी, दादा परिहार, नितीराज थोरात, सतिश पवार, सचिन पिसाळ, रायसिंग घोरपडे, राहूल राऊत यांनी केली.

Previous Post

राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट ; न्यायालयाचा दणका.

Next Post

भरधाव वेगात मोटारसायकली अन् गलका! चौकांत दहशतीचा खेळ; काहींमुळे परिसर वेठीस, व्यवसायाला खीळ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
रामापूर अपघात प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल

भरधाव वेगात मोटारसायकली अन् गलका! चौकांत दहशतीचा खेळ; काहींमुळे परिसर वेठीस, व्यवसायाला खीळ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group