• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट ; न्यायालयाचा दणका.

Admin by Admin
February 4, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट ; न्यायालयाचा दणका.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राज ठाकरे यांना सांगलीच्या शिराळा न्यायालयाने पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

त्यांच्यासोबतच मनसेचे शिरीष पारकर यांना देखील वॉरंट बजावण्यात आला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तारखेला हजर न राहिल्याने कोर्टाने हे वॉरंट बजावलं असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण… 2009 मध्ये रेल्वे आंदोलन प्रकरणी मनसेचे नेते राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या शेडगेवाडी या ठिकाणी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते.

दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी शिराळा पोलीस (Shirala Police) ठाण्यामध्ये तानाजी सावंत यांच्यासह दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये मनसेचे प्रमुख राज ठाकरे व मनसेचे नेते शिरीष पारकर यांचा देखील समावेश होता.

सदर गुन्ह्याचा खटला हा शिराळा न्यायालयामध्ये गेल्या 14 वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान खटल्यासाठी सुनावणीला राज ठाकरे (Raj Thackeray) हे वारंवार गैरहजर राहत असल्याने चार महिन्यांपूर्वी शाळा न्यायालयाकडून राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीन पात्र वॉरंट बजावण्यात आलं होतं. मात्र, हे वॉरंट इस्लामपूर न्यायालयामधून रद्द करून घेण्यात आलं. त्यानंतर राज ठाकरे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीसाठी हजर राहण्याची मुभा देण्यात आली होती. शनिवारी शिराळा न्यायालयात या खटल्याची सुनावणी पार पडली.

राज ठाकरे यांची प्रकृती बरी नाही, तसेच शिरीष पारकर हे बाहेरगावी असल्याने त्यांना आजच्या सुनावणीत मुभा द्यावी, असा अर्ज वकील रवी पाटील यांच्याकडून न्यायालयात सादर करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने सदरचा अर्ज नामंजूर करत राज ठाकरे आणि शिरीष पारकर यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत नक्कीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Previous Post

स्मार्ट पोलिसिंगच्या मार्गावर एलसीबीची उडी ; शिंदेंच्या “स्मार्ट – वर्कने” उघड झाली घरफोडी..!

Next Post

…अन् पत्नीनेचं दिली पतीची सुपारी! अमित भोसलेंच्या खुनाचा सातारा पोलिसांकडून उलगडा…!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
…अन् पत्नीनेचं दिली पतीची सुपारी! अमित भोसलेंच्या खुनाचा सातारा पोलिसांकडून उलगडा…!

…अन् पत्नीनेचं दिली पतीची सुपारी! अमित भोसलेंच्या खुनाचा सातारा पोलिसांकडून उलगडा…!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group