• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जोरदार चर्चा ! बेवड्या मंडल अधिकारी आणि दोन तलाठ्यांना ट्रक चालकाने दिला चोप ; महसूलचे अधिकारी पळ काढत म्हणाले, कोणाला सांगू नका.?

Admin by Admin
January 31, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो, शोध पत्रकारिता
1 min read
0
प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोन शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोकरूड : खबऱ्या प्रतिनिधी/ बांधकामासाठी चिऱ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकची तपासणी करायला आलेल्या महसूल विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना ट्रकवर कारवाई न करता ट्रक मालकाचा पाठीवर प्रसाद घेत माफी मागण्याची वेळ आली.

या प्रकाराची चर्चा शिराळा तालुक्यासह कराड तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. हे अधिकारी कोण? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शनिवार, दि. २८ रोजी कराड तालुक्यातील चिरा वाहतूक करणारा ट्रक रात्री साडेआठच्या सुमारास शेडगेवाडीहून कराडकडे निघला होता. यावेळी महसूल विभागाचे मंडल अधिकारी, दोन तलाठी रात्रीच्या गस्तीवर होते. या अधिकाऱ्यांनी पाठलाग करत ट्रक सांगली जिल्ह्याच्या हद्दीजवळ पकडून येळापूर परिसरात आणला. मालाची पावती खरी की खोटी पाहण्यासाठी तीन तास ट्रक रोखून धरल्याने चालकाने ही माहिती मालकाच्या कानी घातली.

काही वेळाने कराड तालुक्यातून आलेल्या ट्रक मालक व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी या अधिकाऱ्याकडे ओळखपत्राची मागणी करत ट्रक का अडविला, याची विचारणा केली असता मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांना ओळखपत्र अथवा महसूल विभागात असल्याचा पुरावा दाखवता आला नाही. यामुळे गाडी मालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी तिघांना बदडून काढले.

रात्री साडेआकराच्या सुमारास एक जण येळापूर गावात शिरला. ‘वाचवा वाचवा’ अशी आरडाओरड ऐकुन घराबाहेर आलेल्या काही लोकांनी ‘तुम्ही पोलिसांना फोन करा. गावात शिरू नका. चोर समजून आणखी मार खाल, असा सल्ला दिल्यानंतर ‘मी जातो. मात्र, पोलिसांना कळवू नका.’ असे म्हणत त्याने पाठीमागून आलेल्या चारचाकीमधून पोबारा केला.

Previous Post

सांगली-इस्लामपूर रस्ता बाह्य वळणाने रत्नागिरी-नागपूर हायवेस जोडा; मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

Next Post

विट्यातील बँकेची फसवणूक करणाऱ्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
विट्यातील बँकेची फसवणूक करणाऱ्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

विट्यातील बँकेची फसवणूक करणाऱ्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group