(प्रवीण मिरजकर )खबऱ्या प्रतिनिधी /शुक्रवारी २७ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांना सोबत जोडलेल्या चार ग्रामपंचायती व इंडस्ट्रियल असोसिएशन बामनोली यांच्या वतीने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या उपस्थितीत सरपंच अनिल शेगुनसे, कुबेर गणे, सौ.गिता चिंचकर, किरण भोसले, व अनंत चिमड यांनी निवेदन दिले.
या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी लवकरच यासंदर्भात कार्यवाही करू व लवकरच सर्वेही केला जाईल असे आश्वासन दिल्याचे सरपंच अनिल शेगूनसे यांनी सांगितले.
पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या मार्फत यासाठी पाठपुरावा करू, असे बामणोली ग्रामपंचायत सदस्य किरण भोसले यांनी सांगितले. या रस्त्यामुळे या चारही गावचा मोठ्या प्रमाणात विकास होईल व त्याचबरोबर या रस्त्यामुळे वसंतदादा औद्योगिक वसाहत, संजय इंडस्ट्रियल इस्टेट, कुपवाड एमआयडीसी, बामणोली इंडस्ट्रियल एरिया, व सावळी, कानडवाडी या भागातील उद्योग वाढीसाठी याचा फार मोठा उपयोग होईल असे अनंत चिमड यांनी सांगितले.
हा रस्ता अंदाजे बारा ते पंधरा किलोमीटर आहे.
याच्यामुळे महापालिका क्षेत्रामधील वाहतुकीची कोंडी कमी होईल व महापालिका क्षेत्रामधील रस्त्यावर अवजड वाहतुकीचा पडणारा बोजा कमी होईल, त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रस्ते खराब होण्याचे प्रमाण ही कमी होईल.
लवकरच यासंदर्भात या चारही गावचे प्रतिनिधी व परिसरातील उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी यांची एक कृती समिती तयार करून या रस्त्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरले.