• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“त्या” प्रकरणात मिरजेच्या एका संशयिताला अटक , दोघेजण पसार.

सहीसलामत वाचवण्यासाठी मॅनेज करण्याची सुपारी घेतल्याची चर्चा..?

Admin by Admin
January 30, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शोध पत्रकारिता
1 min read
0
प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोन शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज खबऱ्या प्रतिनिधी / क्रिप्टो करेन्सी फसवणूक प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. अब्दुल महंमदसाब इनामदार (राहणार मिरज) असे त्याचे नाव आहे. संशयीतास उद्या तारीख ३१ रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या गुन्ह्यातील मुख्य संशयित डॉ. इब्राहिम महंमदसाब इनामदार, त्याची पत्नी जस्मिन इब्राहिम इनामदार हे तीन महिन्यांपासून पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सादिक यासीन कोचरगी (शहापूर इचलकरंजी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कोचरगी यांचा यंत्रमाग व्यवसाय आहे. त्यांचे शेजारी असलेले लतीफ मुल्ला, त्यांचा मुलगा ओसामा यांची त्यांच्याशी ओळख होती. जानेवारी २०२२ मध्ये संशयित जस्मिन इनामदार, डॉ. इब्राहिम इनामदार व अब्दुल इनामदार यांच्याशी मुलांनी ओळख करून दिली. संशयीतानी कोचरगिरीना क्रिप्टोकरेंसीच्या माध्यमातून तीन महिन्यात दुप्पट रक्कम देतो, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून कोचरगी यांनी १२ लाख तर नईम जंगले यांचे १३ लाख, बंदेनवाज मुजावर यांचे १४ लाख, संभाजी जाधव यांचे २२ लाख अशी एकत्रित ६१ लाखांची गुंतवणूक केली.

या सर्वांची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी संशयीतांच्या घरावर छापे टाकले, आलिशान गाडी जप्त केली. काही महत्त्वाची कागदपत्रे व रोकड ही जप्त केली. आता त्यांची बँक खाते गोठवण्यात आलीत. अन्य मालमत्तांचा शोध ही घेतला जात आहे.

दरम्यान लतीफ मुल्ला यांच्यासह आणि तिघांचे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्याची पडताळणी करून ते दाखल करण्यात आले. कोट्यावधींची फसवणूक झाल्याची तक्रार तिघांनी नोंदवली आहे. त्यानंतर आज एकास अटक करण्यात आली.

Previous Post

कुंडलच्या कुस्ती मैदानात सुमित मलिकची बाजी ; देव थापाची चटकदार लढत.

Next Post

सांगली-इस्लामपूर रस्ता बाह्य वळणाने रत्नागिरी-नागपूर हायवेस जोडा; मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली-इस्लामपूर रस्ता बाह्य वळणाने रत्नागिरी-नागपूर हायवेस जोडा; मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

सांगली-इस्लामपूर रस्ता बाह्य वळणाने रत्नागिरी-नागपूर हायवेस जोडा; मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group