• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खून.! वाढे फाट्यानजीक डोक्यात गोळ्या घालून युवकाची हत्या.

Admin by Admin
January 24, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
खून.! वाढे फाट्यानजीक डोक्यात गोळ्या घालून युवकाची हत्या.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा: खबऱ्या प्रतिनिधी/ सातारा शहरा नजीक असलेल्या महामार्गावरील वाढे गावच्या हद्दीत एका हॉटेल परिसरात गोळीबार करत एकाची हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेला युवक शहरातील शुक्रवार पेठेतील असल्याची माहिती समोर येत आहे.

युवकाच्या डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. गोळीबारानंतर मारेकरी फरार झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील महा- मार्गावर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्याच्या थरारनंतर परिसरात खळबळ उडाली.

वाढे फाट्यानजीक पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यावसाय चालतो. याच परिसरात हा गोळीबार झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आले नाही. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या गोळीबारामुळे हॉटेल व्यावसायिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण
आहे. सदरचा मृत्यू झालेला युवक सातारा शहरातील असून त्याच्यावर सातारा जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे.

त्याठिकाणी त्याच्या कुटुंबियांनी, मित्रांनी धाव घेतली आहे. सातारा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांचे मतदार नोंदणी प्रक्रियेत उत्कृष्ट काम

Next Post

पंतप्रधान मोदी यांनी ‘सीएए’, ‘एनआरसी’ कायदा करून मोठे कार्य केले : धनंजय देसाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पंतप्रधान मोदी यांनी ‘सीएए’, ‘एनआरसी’ कायदा करून मोठे कार्य केले : धनंजय देसाई

पंतप्रधान मोदी यांनी 'सीएए', 'एनआरसी' कायदा करून मोठे कार्य केले : धनंजय देसाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group