• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पंतप्रधान मोदी यांनी ‘सीएए’, ‘एनआरसी’ कायदा करून मोठे कार्य केले : धनंजय देसाई

Admin by Admin
January 24, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
पंतप्रधान मोदी यांनी ‘सीएए’, ‘एनआरसी’ कायदा करून मोठे कार्य केले : धनंजय देसाई
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विटा: खबऱ्या प्रतिनिधी: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएए आणि एन आरसी कायदा करून मोठे कार्य केले आहे, असे प्रतिपादन हिंदू राष्ट्र सेनाप्रमुख धनंजय देसाई यांनी केले.

सांगली जिल्ह्यातील विटा येथे सकल हिंदू समाज विटा शहर आणि खानापूर तालुक्याच्या वतीने हिंदू गर्जना महामोर्चा आज (दि.२४) काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

या मोर्चाचे संयोजन सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी केले. खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, किरण तारळेकर, दहावीर शितोळे, जगन्नाथ पाटील, नितीन जाधव आदीसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चाला श्री भैरवनाथ मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, ते मॉडर्न एज्युकेशन सोसायटी मार्गे साळशिंगे रस्त्यावरील चौंडेश्वरी मंदिरापर्यंत काढण्यात आला. येथे जाहीर सभेने मोर्चाची सांगता झाली.

यावेळी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना निवेदन देण्यात आले. यात लव जिहाद, सक्तीचे धर्मांतरण, गोवंश हत्या निर्बंध कायदा आणि वक्फ बोर्ड मान्यता रद्द करावी. आदी मागण्या केल्या आहेत. हिंदू जनजागृती समितीच्या धनंजय देसाई, हिंदू एकता संघटनेचे विक्रम पावसकर, धनश्री शिंदे आणि मेघना कदम यांची भाषणे झाली.

Previous Post

खून.! वाढे फाट्यानजीक डोक्यात गोळ्या घालून युवकाची हत्या.

Next Post

आष्टात संसर्गजन्य रोगाने दीड हजार डुकरांचा मृत्यू ; कुत्री पिसळण्याचा धोका : स्वच्छता मोहिमेची मागणी.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आष्टात संसर्गजन्य रोगाने दीड हजार डुकरांचा मृत्यू ; कुत्री पिसळण्याचा धोका : स्वच्छता मोहिमेची मागणी.

आष्टात संसर्गजन्य रोगाने दीड हजार डुकरांचा मृत्यू ; कुत्री पिसळण्याचा धोका : स्वच्छता मोहिमेची मागणी.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group