• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांचे मतदार नोंदणी प्रक्रियेत उत्कृष्ट काम

पुणे विभागातून सांगलीतील एकमेव अधिकारी

Admin by Admin
January 24, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांचे मतदार नोंदणी प्रक्रियेत उत्कृष्ट काम
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यस्तरीय पुरस्कार/सन्मान जाहीर

कडेगाव :- कडेगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी गणेश मरकड यांनी मागील वर्षी मतदार नोंदणी प्रक्रियेत उत्कृष्ट काम केल्याने त्यांची राज्यस्तरीय सन्मानासाठी/पुरस्कारासाठी निवड झाली असून पुणे विभागातुन फक्त दोघांची तर सांगलीतील ते एकमेव अधिकारी आहेत. २५ जानेवारी म्हणजेच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त त्यांचा मुंबई येथे सन्मान होणार आहे.

– प्रांताधिकारी गणेश मरकड यांचा सत्कार करताना तहसीलदार डॉ शैलजा पाटील, नायब तहसीलदार किशोर बडबडे,सागर कुलकर्णी व इतर

सण २०२२-२३ या कालावधीमध्ये मतदार नोंदणी कार्यक्रम घेणे, मतदार नोंदवणे ,अर्जाची छाननी करून अर्ज विहित मुदतीत आयोगाचे वेबसाईटवर भरणे यामध्ये पुणे विभागातून केलेल्या कामांमध्ये उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी गणेश मरकड यांनी उत्कृष्ट काम केलेले असून विभागात सर्वात जास्त व अचूक कामकाज केले असल्याने मा. राज्य निवडणूक आयोग यांनी त्यांची राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानासाठी निवड केली असल्याचे एका पत्राद्वारे जाहीर केले आहे .भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दरवर्षीप्रमाणे २५ जानेवारी २०२३ रोजी १३वा राष्ट्रीय मतदान दिन कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य ,श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम या दिवशी सकाळी ११ वाजता ते दुपारी दीड या कालावधीत पाटकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी मरकड यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. पुणे विभागातून मरकड यांचे सोबत कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ सुशांतसिंग किरण बनसोडे यांची निवड झाली आहे.

मरकड यांच्या निवडीने कडेगाव उपविभागातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांचे कौतुकही होत आहे. मरकड यांच्या निवडीची वार्ता समजताच कडेगावच्या तहसीलदार डॉ शैलजा पाटील, उपविभागीय कार्यलयातील नायब तहसीलदार किशोर बडबडे, तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सागर कुलकर्णी, अव्वल कारकून चंद्रकांत पार्लेकर, जयवंत लाड, सुनीता कदम ,सुनील कानडे ,महेंद्र जगताप , राजेंद्र घाडगे,विघ्नेश देसाई यांनी मरकड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Previous Post

मिरजेच्या लाचखोर दूध संकलन पर्यवेक्षकाला लाच घेताना रंगेहाथ अटक.

Next Post

खून.! वाढे फाट्यानजीक डोक्यात गोळ्या घालून युवकाची हत्या.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खून.! वाढे फाट्यानजीक डोक्यात गोळ्या घालून युवकाची हत्या.

खून.! वाढे फाट्यानजीक डोक्यात गोळ्या घालून युवकाची हत्या.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group