Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेच्या लाचखोर दूध संकलन पर्यवेक्षकाला लाच घेताना रंगेहाथ अटक.

Admin by Admin
January 23, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
मिरजेच्या लाचखोर दूध संकलन पर्यवेक्षकाला लाच घेताना रंगेहाथ अटक.

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी/ दुध उत्पादक सहकारी संस्था संचालक मंडळाच्या निवडणुकीतील अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या कागदपत्रे देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना मिरज येथील दुग्धव्यवसाय विकास कार्यालयातील दुध संकलन पर्यवेक्षक तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक श्रीपती बुरुटे (वय ४६ रा.पूर्व म्हाडा कॉलनी, स्वामी समर्थ मंदिरानजीक मिरज ) याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

घटनेची माहिती अशी की, तक्रारदार यांच्या दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बुरुटे याने काम पाहिले होते. संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची कागदपत्रे देण्याकरीता बुरूटे याने तक्रारदार यांच्यांकडे एक हजाराची लाच मागितली. त्याबाबतचा तक्रारदार यांनी दि. २३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला होता.

सोमवारी बुरूटे याच्याविरूध्द मिरजेतील जिल्हा दुग्धव्यवसाय विकास कार्यालयात सापळा लावला. त्याला हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. बुरुटे याच्याविरुध्द महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस उपअधीक्षक विनायक मिलारे, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, अंमलदार प्रितम चौगुले, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, रविंद्र धुमाळ, सलीम मकानदार, अजित पाटील, चंद्रकांत जाधव आदींनी केली.

Previous Post

शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

Next Post

कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांचे मतदार नोंदणी प्रक्रियेत उत्कृष्ट काम

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांचे मतदार नोंदणी प्रक्रियेत उत्कृष्ट काम

कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांचे मतदार नोंदणी प्रक्रियेत उत्कृष्ट काम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014