कडेगाव:- हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती तसेच धर्मनाथ बिजोत्सव निमित्त येतगाव ता. कडेगाव येथे विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती शिवसेना कडेगाव तालुका उपप्रमुख शशिकांत साळुंखे व सचिन सावंत यांनी दिली. यामध्ये मोफत नेत्र तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबीर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे साळुंखे व सावंत यांनी सांगितले. तसेच या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन ही केले.
येतगाव मध्ये सोमवार दिनांक २३ जानेवारी रोजी मोफत नेत्र तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना येतगाव शाखा आणि श्री टेके आय क्लिनिक साईट सी केअर सोसायटी सांगली यांचे संयुक्त विद्यमाने सदर शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पडद्याच्या सर्व नेत्र शस्त्रक्रिया (रेटीना पडदा निसटणे), डायबेटीसमुळे रेटिनोपॅथीसाठी ग्रीन लेझर शस्त्रक्रिया, तिरळेपणावर उपचार, कृत्रिम डोळा बसवणे, बुबळांच्या सर्व शस्त्रक्रिया, बुबुळ बदलणे पापणीच्या आजारावरील शस्त्रक्रिया, डोळ्याच्या खोबणीच्या शस्त्रक्रिया, डोळ्यातील मास वाढणे यावर उपचार केले जाणार आहेत. सदर शिबीर सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत होणार आहे. सदर शिबीर शिवसेना येतगाव शाखेकडून आयोजित करण्यात आले आहे.
२४ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शाश्वत रक्तपेढी मिरज व शिवसेना शाखा कडेगाव यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती साळुंखे व सावंत यांनी दिली. तसेच या दोन्ही शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील लोकांनी घ्यावा असे आवाहनही केलं आहे.

