• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तोंडोलीत अंबिका विद्यामंदिर येथे विविध मान्यवरांचा सत्कार संपन्न

नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच,सदस्यांकडून ग्रामस्थांच्या विकासकामांसाठी अपेक्षा वाढल्या : शिवाजी मोहिते.

Admin by Admin
January 22, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, विशेष, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कडेगांव:प्रतिनिधी / गावातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच,सदस्यांकडून ग्रामस्थांच्या विकासकामांसाठी अपेक्षा वाढल्या आहेत. सरपंच पद हे शोभेचे नव्हे तर ते कामाचे असून गावकऱ्यांनी दिलेल्या संधीचे सरपंच उपसरपंचसह निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी सोने करावे असे उध्दगार पत्रकार शिवाजी मोहिते यांनी काढले ते तोंडोली तालुका कडेगाव येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री अंबिका विद्या मंदिर तोंडोली या शाळेच्या पटांगणात श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्त विविध आयोजित कार्यक्रम करण्यात आले होते.या कार्यक्रमात निर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते, अध्यक्षस्थांनी सरपंच जालींदर कुंभार होते. कार्यक्रमात अभय कुमार मोहिते , फौजी प्रमोद कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी नवनिर्वाचित सरपंच जालिंदर तानाजी कुंभार, उपसरपंच मोहिते रणजित संभाजी, ग्रामपंचायत सदस्य श्री. अभयकुमार विलास मोहिते, नितीन गणपती मोहिते,मोहिते केशव किसन, मुलाणी शमशुद्दीन मुबारक, ग्रामपंचायत सदस्या सौ.मंगल संपत गुरव, सौ दीपश्री विजयकुमार मोहिते,सौ बाबुताई महादेव मोहिते,सौ. रेश्मा शिवप्रसाद मोहिते,सौ.सुनंदा शिवाजी हजारे,सौ सुनिता तुकाराम महापुरे, कडेगाव तालुका मराठी पत्रकार डीजीटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष शिवाजी मोहिते, दैनिक जनमतचे पत्रकार व पुणे एडिटर एडिटर्स असोसिएशन संचालक शिवराज मोहिते पत्रकार युवराज मोहिते, नेवरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिपक साहेबराव मोहिते, क्रियाशील कार्यकर्ते बागवान अहमदअली शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष हणमंत मोहिते, उपाध्यक्ष रेश्मा मोहिते, महादेव मोहिते शिवाजी हजारे यांचेसह नवर्निवाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य, व इतर मान्यवर निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ कार्यक्रम करण्यात आला.

तसेच या कार्यक्रमात शैक्षणिक,कला-क्रीडा, चित्रकला, हस्तलेखन, थाळीफेक,गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, खो-खो,कबड्डी,भालाफेक,कुस्ती,लांबउडी उंच उडी, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करून यात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोहिते ए.डी., पवार व्ही आर, कुंभार एच.डी, कोल्हे जी.ए ,गुरव एम.पी, भिसे आर.ए. नलवडे एस.बी, उपशिक्षिका सौ.अडसुळे एक.एस.उपशिक्षक जानकर टि.वाय, महापुरे पी.एस शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ, विद्यार्थी विद्यार्थिनी सह पालक ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती व धर्मनाथ बिजोत्सवानिमित्त येतगाव मध्ये विविध सामाजिक कार्यक्रम

Next Post

चोरट्यांकडून ८ लाख ५७ हजार २१५ रूपयांचे सोन्या – चांदीचे दागिने हस्तगत.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
चोरट्यांकडून ८ लाख ५७ हजार २१५ रूपयांचे सोन्या – चांदीचे दागिने हस्तगत.

चोरट्यांकडून ८ लाख ५७ हजार २१५ रूपयांचे सोन्या - चांदीचे दागिने हस्तगत.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group