• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली पोलिसांकडून आंतरराज्य टोळीतील दरोडेखोरांचा पर्दाफाश ; तिघे गजाआड..!

Admin by Admin
January 16, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली पोलिसांकडून आंतरराज्य टोळीतील दरोडेखोरांचा पर्दाफाश ; तिघे गजाआड..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली :खबऱ्या प्रतिनिधी/ शहरातील कर्नाळ रोडवरील बंगल्यावर दरोडा टाकून साडेतीन लाखाचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले.

या दरोड्यात अहमदनगर, औरंगाबाद येथील तीन संशयितांना अटक केली आहे. संशयितांकडून पाच लाखाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अजून सहा संशयित फरारी असून ते मध्यप्रदेशातील असल्याचे पोलिस अधिक्षक डाॅ. बसवराज तेली यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. अनिल उर्फ अन्या युवरा पिंपळे (वय ४९, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर), तुकाराम भीमराव घोरवडे (५४. रा. उंडे वस्ती, मातापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), दाजी धनराज सोळंके (३६, रा. हरसूल गायरान, लासूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, शहरातील कर्नाळ रोडवरील दत्तनगर येथे २३ डिसेंबरच्या मध्यरात्री आशिष चिंचवाडे यांच्या बंगल्यावर दरोडा पडला होता. संशयितांनी आशिष यांचे हात बांधून आईला ठार मारण्याची धमकी देत ३ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या दरोड्याचा छडा लावण्यसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सांगली शहर पोलिस ठाण्याची पथके नियुक्त करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीने तपास करण्यात आला. खबऱ्यामार्फत हा दरोडा अहमदनगर, औरंगाबाद येथील संशयितांनी केल्याची माहिती मिळाली. एलसीबीच्या पथकाने श्रीरामपूर पोलिसांच्या मदतीने अनिल पिंपळे, तुकाराम घोरवडे तर औरंगाबाद पोलिसांच्या मदतीने दाजी सोळंके याला अटक केली. या गुन्ह्यात आणखी सहा जणांचा समावेश आहे. हे संशयित मध्यप्रदेशमधील आहेत. संशयितांकडून ९९ ग्रॅम वजनाचे पाच लाखाचे दागिने जप्त करण्यात आले. अजून दोन लाखाची रोकड हस्तगत करण्यात येणार असल्याचे अधिक्षक तेली यांनी सांगितले.

जेरबंद असलेले संशयित एकमेकांचे नातलग

संशयित नऊ दरोडेखोर एकमेकाचे नातेवाईक आहेत. नगर, औरंगाबाद, मध्यप्रदेशमधील नातेवाईक एकत्र येऊन दरोडा टाकत होते. यातील संशयित तुकाराम घोरवडे हा मध्यप्रदेशमधील साडेसहा वर्षे तुरूंगात होता. आठ महिन्यापूर्वीच तो तुरूंगातून बाहेर आला होता. या टोळीविरूद्ध छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्रात गुन्हे दाखल आहेत.

रेकी करत पाळत ठेवून दरोडा

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने अटक केलेल्या तिघांसह सहा जण महाराष्ट्र एक्सप्रेसने सांगलीत आले. रेल्वे स्थानकावरून ते बसस्थानकात आले. तिथे वेगवेगळे ग्रुप करून घरफोडीसाठी बंगला शोधण्यास सुरूवात केली. दत्तनगर येथील चिंचवाडे यांचा बंगल्यावर पाळत ठेवली. रात्री नऊ जणांनी घराच्या पाठीमागील दरवाज्याचे कुलुप तोडन आत प्रवेश करीत चोरी केली.

Previous Post

अल्पवयीन गर्भवती माता व बाळाचा मृत्यू, प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतीमुळे बालविवाहाचे प्रकरण उघडकीस..

Next Post

कडेगावात वाळू तस्कर मोकाट, प्रशासनाचा धाकच नाही

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
रामापूर अपघात प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल

कडेगावात वाळू तस्कर मोकाट, प्रशासनाचा धाकच नाही

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group