• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अल्पवयीन गर्भवती माता व बाळाचा मृत्यू, प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतीमुळे बालविवाहाचे प्रकरण उघडकीस..

Admin by Admin
January 16, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
अल्पवयीन गर्भवती माता व बाळाचा मृत्यू, प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतीमुळे बालविवाहाचे प्रकरण उघडकीस..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : अल्पवयीन गर्भवतीच प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सांगली जिल्ह्यातील प्रसूतीसाठी आलेल्या अल्पवयीन गर्भवतींच्या मुळे बालविवाहाचे प्रकार उघडकीस आले आहेत.

मागील दोन महिन्यात पाच घटना उघडकिस आल्या आहेत. तर तासगावमधील एक अल्पवयीन गर्भवती माता आणि तिच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

आजही समाजात लपून-छपून बालविवाह केले जात आहेत. मिरज वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या अल्पवयीन विवाहितांमुळे बालविवाहाचे प्रकार उघडकीस आले आहेत. मागील दोन महिन्यात तब्बल पाच घटना समोर आले आहेत. विटा, तासगाव आणि नाशिकमधील एक तर रायगडमधील दोन अल्पवयीन विवाहिता प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. याबाबत रुग्णालय प्रशासनाने पोलिसांच्याकडे माहिती दिली. पोलिसांनी चौकशी करून गुन्हे दाखल केले जात आहेत.

अन्‍य अल्‍पवयीन विवाहितांबाबत दिली माहिती

मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये कालच तासगाव तालुक्यातील एक अल्पवयीन सतरा वर्षीय गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर तिच्या बाळाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तसेच अन्य अल्पवयीन विवाहितांच्या माहिती रुग्णालयाने पोलीस विभागाकडे पाठवली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अल्पवयीन गर्भवतींची माहिती मिळाल्यानंतर पोलीस याबाबत चौकशी करतात. पत्नीचे आणि पतीचे आई-वडील आणि पतीवर बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम आणि बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जातो.

Previous Post

गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना भिलवडीत अटक ; ८ किलो गांजा सह १ मोटरसायकल जप्त.

Next Post

सांगली पोलिसांकडून आंतरराज्य टोळीतील दरोडेखोरांचा पर्दाफाश ; तिघे गजाआड..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली पोलिसांकडून आंतरराज्य टोळीतील दरोडेखोरांचा पर्दाफाश ; तिघे गजाआड..!

सांगली पोलिसांकडून आंतरराज्य टोळीतील दरोडेखोरांचा पर्दाफाश ; तिघे गजाआड..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group