• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना भिलवडीत अटक ; ८ किलो गांजा सह १ मोटरसायकल जप्त.

Admin by Admin
January 16, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना भिलवडीत अटक ; ८ किलो गांजा सह १ मोटरसायकल जप्त.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

भिलवडी : खबऱ्या प्रतिनिधी / सांगली जिल्ह्यातील भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील आमणापुर रस्त्यावरील एका हॉल जवळ थांबलेल्या दोघांना
अटक करून ८ किलो गांजा, एक दुचाकी
असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक
गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी
सायंकाळी ही कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

अजिंक्य विजय जाधव (वय 30), संदीप पिलाजी यादव (वय 27, दोघेही रा. आळसंद, ता. खानापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण
शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक
पथक तयार केले. रविवारी भिलवडी- आमनापूर रस्त्यावरील एका हॉलजवळ दोघेजण विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन दोघेजण गांजा विक्री करण्यासाठी आल्याची माहिती निरीक्षक शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे 8 किलो गांजा सापडला.

दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली असून त्यांच्यावर भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदरची कारवाई केली.

Previous Post

शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी २०२३,अंतिम सामन्यात महेंद्रला आसमान दाखवलं; चितपट करत मिळवला विजय.

Next Post

अल्पवयीन गर्भवती माता व बाळाचा मृत्यू, प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतीमुळे बालविवाहाचे प्रकरण उघडकीस..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अल्पवयीन गर्भवती माता व बाळाचा मृत्यू, प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतीमुळे बालविवाहाचे प्रकरण उघडकीस..

अल्पवयीन गर्भवती माता व बाळाचा मृत्यू, प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतीमुळे बालविवाहाचे प्रकरण उघडकीस..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group