• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मतीन काझीसह तिघेजण तडीपार

Admin by Admin
January 14, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली शहर पोलिसांची धडक कारवाई ; रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेली रत्नागिरीची “ती” महिला ताब्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी मतीन काझी याच्यासह तिघांना प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून हद्दपार केले.

हद्दपार करण्यात आलेल्यामध्ये मतीन साहेबपीर चमनमलिक काझी (रा. टाकळी रस्ता, मिरज), अविनाश उत्तम काटकर (रा. रसूलवाडी, ता. मिरज) आणि अजय उर्फ अजित पांडूरंग खोत (रा. वडर कॉलनी, सांगली) या तिघांचा समावेश आहे.

युवा सेना समन्वयक मतीन काझी याने दोन महिन्यापूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याच्यावर मिरज शहर, महात्मा गांधी चौक व विश्रामबाग पोलिसात खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव दाखल होता.

सांगलीतील वडर कॉलनीमधील अजय खोत याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसात मारामारी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे तीन गुन्हे दाखल असल्याने त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तर रसूलवाडी (ता. मिरज) येथील अविनाश काटकर याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारामारी, बेकायदा शास्त्र बाळगणे असे तीन गुन्हे दाखल असल्याने त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केला होता.

Previous Post

सांगली : रेणावी गावातील शेकडो वर्षांची शाकाहारी परंपरा!

Next Post

बुधगावमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बुधगावमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न

बुधगावमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group