• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : रेणावी गावातील शेकडो वर्षांची शाकाहारी परंपरा!

Admin by Admin
January 14, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष, शोध पत्रकारिता
1 min read
0
सांगली : रेणावी गावातील शेकडो वर्षांची शाकाहारी परंपरा!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात अख्य गावच शाकाहारी असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय या गावात नांदायला येणाऱ्या सुनेला चक्क मांसाहाराचा त्याग करण्याची शपथ खावी लागते.

जिल्हा हा तसा पाहिला तर कोल्हापूरप्रमाणेच मांसाहारप्रेमी जिल्हा! प्रत्येक गावातील रस्त्या-रस्त्यांवरील आणि चौका- चौकांतील धावे ही त्याचीच निशाणी आहेत; पण मांसाहार खवय्यांच्या या मांदियाळीतही जिल्ह्यातील एक गाव आपले शुद्ध शाकाहारीपण टिकवून आहे, ते गाव म्हणजे खानापूर तालुक्यातील रेणावी. रेणावी गावी नवनाथांपैकी रेवणसिद्धनाथांचे ठाणे आहे. हे देवस्थान जागृत समजले जाते. या गावात शेकडो वर्षांपासून मांसाहार वर्ज्य आहे. त्यामुळे संपूर्ण गावच शाकाहारी आहे. लग्न करून बाहेरून या गावात नांदायला येणाऱ्या सुनेलाही उंबऱ्यावरचे माप ओलांडण्याआधी मांसाहाराचा त्याग करावा लागतो. एवढेच नव्हे, तर या गावच्या जावयाचेही मांसाहार सोडून सगळे कोडकौतुक पुरविले जाते. कामधंदा आणि नोकरीनिमित्त या गावातून बाहेर जाणारी मंडळीसुद्धा आपला हा ‘शाकाहार मंत्र’ कटाक्षाने जपताना दिसतात.

Previous Post

भाजप नेते मोहन वनखंडे यांच्या संपत्तीची ईडी कडून चौकशी करावी :- डॉ. महेशकुमार कांबळे यांची मागणी

Next Post

मतीन काझीसह तिघेजण तडीपार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली शहर पोलिसांची धडक कारवाई ; रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेली रत्नागिरीची “ती” महिला ताब्यात..!

मतीन काझीसह तिघेजण तडीपार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group