• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भाजप नेते मोहन वनखंडे यांच्या संपत्तीची ईडी कडून चौकशी करावी :- डॉ. महेशकुमार कांबळे यांची मागणी

सांगलीकर मळ्यातील जमीन खरेदी व्यवहार बेकायदेशीर असल्याचा आरोप.

Admin by Admin
January 13, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, विशेष
1 min read
0
भाजप नेते मोहन वनखंडे यांच्या संपत्तीची ईडी कडून चौकशी करावी :- डॉ. महेशकुमार कांबळे यांची मागणी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज – खबऱ्या प्रतिनिधी / मिरज मधील सांगलीकर मळा येथील गट नं १२८/२ ही जागा १३७ गुंठे जमीन अनाथ विद्यार्थी सहाय्यक मंडळासह राष्ट्रवादी चे महापालिकेतील गटनेते तथा माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह ४ जणांची होती. तर अनाथ विद्यार्थी सहाय्यक मंडळ यांची कोणतीही एनओसी न घेता सदरची जागा भाजपचे अनुसूचित जाती मोर्चा चे प्रदेश सचिव तसेच विद्यमान पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे खाजगी सचिव मोहन वनखंडे यांनी चैतन्य माऊली डेव्हलपर्स चे भागीदार म्हणून आणि दुसरे भागीदार बबन शंकर लवटे यांनी २०२१ रोजी खरेदी केली आहे. तर यासाठी सांगली अर्बन को. ऑप बँक लि. सांगली यांनी २०२१ ला यासाठी ३ कोटींचे कर्ज दिले होते ,सदरची जागा खरेदी करताना २०२१ रोजी कोरोना लॉक डाऊन असताना मिरज दुय्यम निबंधक क्र १ हे रजेवर असताना एका कनिष्ठ लिपिक असणाऱ्या मारुती अर्जुन सुभाणे यांच्या सहीने खरेदी करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप एमआयएम चे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत केला आहे.

सदरची जागा अनाथ विद्यार्थी सहाय्यक मंडळाची असताना खरेदी झालीच कशी, असा सवाल उपस्थित केला आहे. तर खरेदी दस्त करणाऱ्या लिपिक व प्रभारी मारुती अर्जुन सुभाणे यांची चौकशी करून त्यांना सुद्धा निलंबित करण्याची मागणी यावेळी डॉ महेशकुमार कांबळे यांनी केली. मोहन वनखंडे यांची ईडी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी सुद्धा पंतप्रधान रोजगार निधी योजनेतून पत्नी साठी आणि मुख्यमंत्री रोजगार निधी योजनेतून स्वतः साठी एकच व्यवसाय आणि एकाच जागेची कागदपत्रे दाखवुन सत्तेचा दुरुपयोग करून २५ लाख रुपये पंतप्रधान रोजगार निधी योजना आणि २५ लाख रुपये मुख्यमंत्री रोजगार निधी योजना कडून मंजूर करून घेऊन दोघा पती पत्नीनी सत्तेचा दुरुपयोग करून अनुदान लाटल्याचा गंभीर आरोप डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा यावेळी दिला आहे.

Previous Post

कडेगावात वाळू तस्करांकडून प्रशासनाला खुले आव्हान ?

Next Post

सांगली : रेणावी गावातील शेकडो वर्षांची शाकाहारी परंपरा!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली : रेणावी गावातील शेकडो वर्षांची शाकाहारी परंपरा!

सांगली : रेणावी गावातील शेकडो वर्षांची शाकाहारी परंपरा!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group