• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या वसुली प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ द्या

कडेगाव तालुक्यातील सर्वसेवा सोसायटी व शेतकऱ्यांची मागणी

Admin by Admin
January 5, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव:- थकबाकीदार शेतकऱ्यांकडील थकबाकी वसूल व्हावी आणि शेतकऱ्यांना ही फायदा होऊन ते कर्ज मुक्त व्हावेत या हेतूने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राबवेलेली “वसुली प्रोत्साहन योजना” यास मुदत वाढ मिळावी अशी मागणी कडेगाव तालुक्यातील सर्वसेवा सोसायटी व शेतकऱ्यांनी केली आहे.सदर योजनेची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपली असून अनेक शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहेत मात्र बहुतांशी शेतकऱ्यांचा ऊस अजूनही शेतात आहे आणि ऊस गेल्याशिवाय पैसा हाती येणार नाही त्यामुळं सदर योजनेची मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवावी अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांनी सोसायटीच्या माध्यमातून अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीची कर्जे घेतली होती. काही शेतकऱ्यांची आपत्कालीन परिस्थिती ,आर्थिक परिस्थिती आणि इतर कारणांमुळे कर्जे थकीत गेली. कर्ज थकीत गेल्याने व्याज दरात वाढ झाली. यामध्ये अल्पमुदत कर्ज नियमित असल्यास ६% दराने ,अनियमित झाल्यास १०.५०% आणि दंड व्याज २% असे १२.५०% दराने व्याज आकारणी केली जाते. मध्यम आणि दिर्घ मुदत कर्जाच्या बाबतीत नियमित कर्जास १२.५०% आणि अनियमित कर्जास २% दंड व्याज म्हणजे १४.५०% व्याज आकारणी केली जाते. यामध्ये शेतकऱ्यांची मोठी आर्थिक पिळवणूक होते. शासनाने कर्ज माफी केल्यानंतर ही निकषात न बसल्याने काही शेतकरी कर्ज मुक्ती पासून वंचित राहिले.

३१ डिसेंबर २०२१ अखेर जिल्ह्यातील ७६७ विकास संस्थांपैकी ७२२ संस्थांच्या ५३७०८ सभासदांकडे ४८१ कोटी ९८ लाख रुपयांची अल्प,मध्यम आणि दिर्घ मुदत कर्जाची थकबाकी होती त्यापैकी १४६८४ शेतकऱ्यांकडे १५८ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी ही ३ वर्षावरील होती. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आल्याने त्यांचे कडील कर्ज वसुली करणे अडचणीचे झाले होते त्यामुळे कर्ज वसुलीमध्ये काही सूट अथवा सवलत मिळावी अशी शेतकरी व विकास संस्थांकडून बँकेकडे वारंवार मागणी होत होती या मागणीचे अनुषंगाने नाबार्ड/रिझर्व बँक व शासन यांच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ सभा दि.२८ फेब्रुवारी २०२२ मध्ये विचार होऊन वसुली “प्रोत्साहन निधी योजना” राबविणे बाबत संचालक मंडळाने शिफारस केली आणि बँकेचे दिनांक १९ मार्च २०२२ चे विशेष साधारण सभेने त्या योजनेस मंजुरी दिली होती.

या योजनेत दि ३० जून २०१८ अखेर किंवा त्यापूर्वीचे पीक किंवा अल्प,मध्यम आणि दिर्घ मुदत कर्जाचे थकबाकीदार सभासद पात्र धरले जायचे. पात्र थकबाकीदार कर्जदारांच्या कर्जास थक तारखेपासून पुढे ६% सरळ व्याज आकारणी केली जाणार होती. यामुळं अल्प मुदत थक कर्जदारांना ६.५०% आणि मध्यम व दिर्घ मुदत कर्जदारांना ८.५०% इतकी व्याजात सूट मिळणार होती तर शेतकऱ्यांना दिलेल्या व्याजापोटी विकास संस्थांना ४.५०% ने बँकेकडून वसुली प्रोत्साहन निधी योजनेतून दिली जाणार होती.या योजनेमुळे शेतकऱ्यांकडील थकबाकी वसुली होणार होती तसेच त्यांना व्याजात सवलत मिळणार होती आणि विकास संस्थांना ही लाभ मिळणार होता. मात्र या योजनेची मुदत ३१ डिसेंबर ला सम्पल्याने अजूनही अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत.

अनेक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यायचा आहे परंतु हाती पैसे नसल्याने ते सध्या शक्य नाही. शेतातील ऊस गेल्यानंतर हे शक्य असल्याने बँकेने सदर योजनेची मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवावी अशी मागणी कडेगाव तालुक्यातील सोसायटी व शेतकऱ्यांमधून होत आहे.

Previous Post

मोठी बातमी : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी बातमी: पहिल्यांदाच भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिंदे गटाची महायुती ; ठाकरे गट एकाकी..!

Next Post

वसुली प्रोत्साहन योजनेबाबत संचालक मंडळ बैठकीत बोलून सकारात्मक निर्णय घेऊ:- आमदार मोहनराव कदम

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वसुली प्रोत्साहन योजनेबाबत संचालक मंडळ बैठकीत बोलून सकारात्मक निर्णय घेऊ:- आमदार मोहनराव कदम

वसुली प्रोत्साहन योजनेबाबत संचालक मंडळ बैठकीत बोलून सकारात्मक निर्णय घेऊ:- आमदार मोहनराव कदम

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group